Cinema Lovers Day 2024 : सिनेप्रेमींसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. 'सिनेमा लव्हर्स डे'निमित्त  (Cinema Lovers Day 2024) कोणताही सिनेमा (Movies) प्रेक्षकांना फक्त 99 रुपयांत पाहता येणार आहे. सिनेमे पाहणारा मोठा प्रेक्षकवर्ग आहे. पण प्रत्येक सिनेमाचं तिकीट काढून तो सिनेमागृहात पाहणं प्रेक्षकांना परवडत नाही. हीच बात लक्षात घेऊन  'सिनेमा लव्हर्स डे'निमित्त पीव्हीआर (PVR) आणि आयनॉक्स (INOX) यांनी सिनेप्रेक्षकांना खास ऑफर दिली आहे.


सिनेमागृहात सध्या 'तेरी बातों में ऐसा लझा जिया', 'फायटर' आणि 'कुछ खट्टा हो जाए' हे सिनेमे धमाका करत आहेत. तर येत्या शुक्रवारी 'क्रॅक','आर्टिकल 370' आणि 'ऑल इंडिया रँक' हे सिनेमे रिलीज होणार आहे. प्रीमियम सिनेमा फॉर्मेट आणि रीक्लायनर खुर्च्यांसाठीदेखील ही खास ऑफर असणार आहे. 






बॉलिवूड सिनेमांसह 'मॅडम वेब', 'द होल्डओवर्स','बॉब मार्ले-वन लव' आणि 'मीन गर्ल्स','द टीचर्स लॉन्ज' हे सिनेमेदेखील प्रेक्षकांना 99 रुपयांत पाहता येणार आहेत. तर रीक्लायनरच्या तिकीटांची किंमत 199 रुपये आहे. ही ऑफर निवडक शहरांमध्येच लागू असेल.






राष्ट्रीय चित्रपट दिनानंतर आता साजरा होणार 'सिनेमा लव्हर्स डे'


'सिनेमा लव्हर्स डे'निमित्त बोलताना पीव्हीआर-आयनॉक्सचे सीईओ गौतम दत्ता म्हणाले,"भारतीय प्रेक्षकांसाठी सिनेमा खूपच खास आहे. आवडीने ते सिनेमा पाहायला जातात. 'नॅशनल सिनेमा डे'ला प्रेक्षकांचा मिळालेला प्रतिसाद पाहता आता आम्ही सिनेमा लव्हर्स डे साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. भारतीय सिनेप्रेमींनी 99 रुपयांत मोठ्या संख्येने सिनेमा पाहावा अशी आमची इच्छा आहे". 


'सिनेमा लव्हर्स डे'आधी 23 सप्टेंबर 2022 रोजी राष्ट्रीय चित्रपट दिन (National Cinema Day) साजरा करण्यात आला होता. त्यावेळी सर्व तिकिटांची किंमत 75 रुपये ठेवण्यात आली होती. 2023 मध्ये, 13 ऑक्टोबर रोजी राष्ट्रीय सिनेमा दिन साजरा करण्यात आला, ज्यामध्ये 6 दशलक्षाहून अधिक लोकांनी सिनेमागृहात जाऊन सिनेमा पाहिला.


संबंधित बातम्या


Shah Rukh Khan : शाहरुखच्या 'जवान'ने राष्ट्रीय चित्रपट दिनी केले दोन नवे रेकॉर्ड; बॉक्स ऑफिसवर केली कोट्यवधींची कमाई