Mansoor Ali Khan Comment: दक्षिण चित्रपटसृष्टीची प्रसिद्ध अभिनेत्री त्रिशा कृष्णनचा (Trisha Krishnan) काही दिवसांपूर्वी लिओ (Leo) हा चित्रपट रिलीज झाला. या चित्रपटात थलपथी विजयनं (Vijay) देखील काम केलं आहे. या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला. या चित्रपटात मन्सूर अली खाननं या चित्रपटात खलनायकाची भूमिका साकारली आहे. सध्या मन्सूर अली खान (Mansoor Ali Khan) हा त्याच्या एका वक्तव्यामुळे चर्चेत आहे. त्याच्या या वक्तव्यावर दाक्षिणत्य चित्रपटसृष्टीतील कलाकारांनी संताप व्यक्त केला आहे. आता मन्सूर  या वक्तव्यावर माफी मागण्यास देखील नकार दिला आहे.


मन्सूर अली खानचं वादग्रस्त वक्तव्य (Mansoor Ali Khan Comment On Trisha)


एका मुलाखतीमध्ये मन्सूर अली खान यानं लियो चित्रपटाबाबत आणि त्रिशाबाबत वादग्रस्त वक्तव्य केलं. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये दिसत आहे की मन्सूर म्हणतो की, "लिओ चित्रपटात माझा त्रिशासोबतचा बलात्काराचा कोणताही सीन नव्हता याबद्दल खेद वाटतो. मला वाटले होतं की, मी तिला बेडरूममध्ये घेऊन जाईन, जसे मी चित्रपटांमध्ये इतर अभिनेत्रींना  घेऊन जातो. मी अनेक रेप सीन्स केले आहेत आणि माझ्यासाठी हे काही नवीन नाही. पण काश्मीर शेड्युलमुळे मला त्रिशाला पाहण्याची संधीही मिळाली नाही. " मन्सूरनं त्रिशाबाबत केलेल्या या वक्तव्यावर अनेकांनी संताप व्यक्त केला आहे. 


त्रिशाची प्रतिक्रिया 


अभिनेत्री त्रिशानं मन्सूर अली खानच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया दिली आहे. तिनं ट्वीटच्या माध्यमातून तिची प्रतिक्रिया दिली आहे. या ट्वीटमध्ये तिनं लिहिलं, "अलीकडेच मी एक व्हिडीओ पाहिला आहे. ज्यामध्ये मन्सूर अली खान हे माझ्याबद्दल नीच आणि घृणास्पद रीतीने बोलले आहेत. मी याचा तीव्र निषेध करते. हे अनादरकारक, अशोभनीय, तिरस्करणीय आणि वाईट आहे.तो अशी इच्छा ठेवू शकतो पण मी त्याच्यासारख्या व्यक्तीसोबत कधीही स्क्रीन स्पेस शेअर न केल्याबद्दल कृतज्ञ आहे. माझ्या उर्वरित चित्रपट कारकिर्दीतही असे कधीही होणार नाही याची मी खात्री करेन. त्याच्यासारखे लोक मानवजातीचे नाव बदनाम करतात."






साऊथ इंडस्ट्रीकडून संताप व्यक्त


अनेक कलाकारांनी मन्सूर अली खाननं केलेल्या वक्तव्यावर सोशल मीडियाच्या माध्यमातून संताप व्यक्त केला आहे. अभिनेते चिरंजीवी यांनी देखील ट्वीट शेअर करुन मन्सूरच्या वक्तव्याचा निषेध केला आहे. त्यांनी ट्वीट केलं, "अभिनेता मन्सूर अली खानने त्रिशाबद्दल केलेल्या काही निंदनीय कमेंटनं माझे लक्ष वेधले. ही कमेंट केवळ कलाकारासाठीच नाही तर कोणत्याही स्त्री किंवा मुलीसाठी घृणास्पद आहेत. या टिप्पण्यांचा तीव्र शब्दात निषेध केला पाहिजे. "






मी माफी मागणार नाही: मन्सूर अली खान


मन्सूर अली खाननं नुकतीच एक पत्रकार परिषद घेतली. यामध्ये 'मी माझ्या वक्तव्यासाठी माफी मागणार नाही', असं सांगितलं. तो म्हणाला, "हा व्हिडीओ एडिट करुन दाखवण्यात आला आहे"


इतर महत्वाच्या बातम्या:


Leo OTT Release Date Announced: बॉक्स ऑफिस गाजवल्यानंतर थलापती विजयचा 'लियो' ओटीटीवर होणार रिलीज; कधी आणि कोणत्या प्लॅटफॉर्मवर पाहता येणार चित्रपट? जाणून घ्या