Bageshwar Dham Movie : मध्यप्रदेशातील 'बागेश्वर धाम' (Bageshwar Dham) हे ठिकाण गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. बागेश्वर धाममध्ये पंडित धीरेंद्र कृष्ण शास्त्री (Pt. Dhirendra Krishna Shastri) यांचा दरबार भरतो. धीरेंद्र शास्त्री हे बागेश्वर धाममध्ये येणाऱ्या भाविकांचं मन वाचता येत असल्याचा दावा करतात. बागेश्वर धामची चमत्कारिक शक्ती पाहून सर्वांनाच आश्चर्य वाटते. आता या बागेश्वर धामवर (Bageshwar Dham Movie) सिनेमा येणार आहे. 


बागेश्वर धामवर सिनेमा येणार असल्याची घोषणा अभय प्रताप सिंहने (Abhay Pratap Singh) केली आहे. तसेच तेच या सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरादेखील सांभाळणार आहेत. लवकरच या सिनेमाच्या शूटिंगला सुरुवात होणार आहे. मीडिया रिपोर्टनुसार, पुढील महिन्यात या सिनेमाच्या शूटिंगला सुरुवात होणार आहे. मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेशच्या काही भागांमध्ये सिनेमाचं शूटिंग होणार आहे.


'बागेश्वर धाम'चं असणार सिनेमाचं नाव


'बागेश्वर धाम' या सिनेमाबद्दल बोलताना दिग्दर्शक अभय प्रताप सिंह म्हणाले,"बागेश्वर धाम' या सिनेमात बागेश्वर धामचे धार्मिक महत्त्व तसेच मानवतावादी आणि सामाजिक कार्य यासर्व गोष्टींवर प्रकाश टाकण्यात येणार आहे. या सिनेमाचं नाव नोंदणीकृत केलं आहे. एपीएस पिक्चर्सच्या बॅनरअंतर्गत या सिनेमाची निर्मिती होणार आहे. 


'बागेश्वर धाम'मध्ये कोणते कलाकार झळकणार? (Bageshwar Dham Starcast)


'बागेश्वर धाम' या सिनेमाची घोषणा झाल्यापासून या सिनेमात नक्की काय पाहायला मिळणार, या सिनेमात कोणते कलाकार मुख्य भूमिकेत झळकणार याची चाहत्यांना उत्सुकता आहे. अद्याप निर्मात्यांनी या सिनेमाच्या स्टारकास्टबद्दल माहिती दिलेली नाही. 
सिनेमात कोणते कलाकार झळकतील याबद्दल बोलताना अभय प्रताप सिंह म्हणाले,"बागेश्वर धाम' या सिनेमात बॉलिवूडचे अनेक लोकप्रिय आणि दिग्गज कलाकार झळकणार आहेत. लवकरच कलाकारांची घोषणा करण्यात येईल". 


दसऱ्याच्या मुहूर्तावर 'बागेश्वर धाम' होणार रिलीज! (Bageshwar Dham Movie Released Date)


'बागेश्वर धाम' हा सिनेमा यावर्षातच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. रिपोर्टनुसार, दसऱ्याच्या मुहूर्तावर हा सिनेमा देशभरातील सिनेमागृहांत प्रदर्शित होणार आहे. पंडित धीरेंद्र शास्त्री हे देशाला हिंदू राष्ट्र बनवण्याच्या त्यांच्या विधानांमुळे चर्चेत असतात. स्वत:ला दैवी शक्ती प्राप्त असून आपण सर्व लोकांची कोणत्याही संकटातून मुक्तता करु शकतो, असा धीरेंद्र कृष्ण शास्त्रींचा दावा आहे. आता 'बागेश्वर धाम' या सिनेमात अनेक चमत्कारिक रहस्ये उलगडण्यात येणार आहेत.


संबंधित बातम्या


Dhirendra Shastri : धीरेंद्र शास्त्रींच्या कार्यक्रमात चोरट्यांचा डल्ला, सुमारे 5 लाख किमतीचे दागिने चोरीला