Prabhas SS Rajamouli Chatrapathi Trailer out : दाक्षिणात्य कलाकारांना आता बॉलिवूडची भूरळ पडत आहे. गेल्या काही दिवसांत अनेक दाक्षिणात्य कलाकारांनी हिंदी सिनेसृष्टीत पाऊल ठेवलं आहे. आता तेलुगू अभिनेता बेलमकोंडा श्रीनिवास (Bellamkonda Sreenivas) 'छत्रपती' (Chatrapathi) या सिनेमाच्या माध्यमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहे. नुकताच या सिनेमाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. 


'छत्रपती' हा 2005 साली प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. तेलुगू भाषेत प्रदर्शित झालेला हा सिनेमा एस.एस राजामौलींनी प्रदर्शित केला होता. या सिनेमात दाक्षिणात्य सुपरस्टार प्रभास (Prabhas) आणि श्रिया सरन मुख्य भूमिकेत होते. त्यावेळा हा सिनेमा चांगलाच गाजला. आता या सिनेमाचा हिंदी रिमेक प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 


'छत्रपती' सिनेमाच्या ट्रेलरमध्ये अॅक्शन, थरार, नाट्य आणि रोमान्स पाहायला मिळत आहे. या सिनेमातील डायलॉग प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेणारे आहेत. "अपने लिए तो हर कोई जीता है, लेकिन जो औरों के लिए जीता है उसे छत्रपती कहते है", असे डायलॉग या सिनेमात आहेत. अल्पावधीतच या ट्रेलरला लाखो व्ह्यूज मिळाले आहेत. बेलमकोंडा श्रीनिवासचा अॅक्शनमोड ट्रेलरमध्ये पाहायला मिळत आहे.






बेलमकोंडा श्रीनिवास आणि नुसरत भरुचा या सिनेमात मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. तर शरद केळकर, भाग्यश्री, साहिल वैद्य, अमित नायर, राजेंद्र गुप्ता, शिवम पाटील, आशिष सिंह हे कलाकारदेखील या सिनेमात महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. वी.वी विनायकने या सिनेमाचं दिग्दर्शन केलं आहे. तर जयंतीलाल गडा यांनी या सिनेमाची निर्मिती केली आहे. 


'छत्रपती' कधी रिलीज होणार? (Chatrapathi Release Date)


'छत्रपती' हा दाक्षिणात्य सिनेमा सुपरहिट ठरला होता. या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर चांगलाच गल्ला जमवला होता. त्यामुळे 'छत्रपती'च्या रिमेकची घोषणा झाल्यापासून हा सिनेमा चर्चेत आहे. 12 मे 2023 रोजी हा सिनेमा सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे. या सिनेमाच्या माध्यमातून प्रेक्षकांना मनोरंजनाची मेजवानी मिळणार आहे. 


बेलमकोंडा श्रीनिवासने 'छत्रपती' या सिनेमात छत्रपती नावाच्या एका मुलाची भूमिका साकारली आहे. एका छोट्या गावात राहणाऱ्या छत्रपती नावाच्या मुलाची गोष्ट या सिनेमात दाखवण्यात आली आहे. ट्रेलरमध्ये आईच्या शोधासाठी वेगवेगळे प्रयत्न करताना छत्रपती दिसतो आहे. तसेच गावकऱ्यांच्या मदतीला धावून जाणारा 'छत्रपती' मुलगा या सिनेमात प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. 


संबंधित बातम्या


जबरदस्त डायलॉग्स अन् अॅक्शन; 'छत्रपती' चा टीझर पाहिलात का?