Celebrity Who Got Death Threats : बॉलिवूड सलमान खानला लॉरेन्स बिश्नोई टोळीकडून सतत जीवे मारण्याच्या धमक्या येत आहेत. माजी मंत्री राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते बाबा सिद्दीकी यांच्या गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. त्यांच्या हत्येची जबाबदारी लॉरेन्स बिश्नोई गँगने स्वीकारली आहे. बाबा सिद्दीकी सलमान खानचे जवळचे मित्र होते, या कारणाने त्यांची हत्या केल्याचं बिश्नोई टोळीनं म्हटलं आहे. बिश्नोई गँगच्या धमकीनंतर अभिनेता सलमान खानची सुरक्षा वाढवण्यात आली आहे.


सलमान खानसोबत 'या' स्टार्सच्या जीवालाही धोका


बाबा सिद्दीकींच्या हत्येनंतर बिश्नोई गँगने काळवीट हत्या प्रकरणात सलमान खानला माफी मागायला सांगितलं आहे. सलमान खानला मारण्यासाठी बिश्नोई गँगने 25 लाखांची सुपारी दिल्याची माहितीही समोर आली आहे. सलमान खानच्या घरावर काही महिन्यांपूर्वी गोळीबारही झाला होता. याआधीही सलमानला अनेकदा जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. सलमान खानशिवाय इंडस्ट्रीमधील इतरही अनेक स्टार्स आहेत, ज्यांच्या जीवाला धोका आहे. या कारणामुळे त्यांच्याही सुरक्षेतक वाढ करण्यात आली होती.


शाहरुख खान


बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खानचो गेल्या वर्षी जवान आणि पठाण हे दोन चित्रपट हिट झालो होते. यानंतर धोका लक्षात घेऊन त्याची सुरक्षा वाढवण्यात आली होती. गेल्या वर्षी शाहरुख खानला वाय प्लस सुरक्षा देण्यात आली होती. अभिनेता शाहरुख खानसोबत सहा पोलीस कमांडो नेहमीच अंगरक्षक म्हणून असतात.


अनुपम खेर


बॉलिवूड अभिनेता अनुपम खेर यांना विवेक अग्निहोत्री दिग्दर्शित 'द काश्मीर फाइल्स' चित्रपटानंतर जीवे मारण्याच्या धमक्या आल्या होत्या. यानंतर अनुपम खेर यांची सुरक्षा वाढवण्यात आली. त्यांना एक्स प्लस सुरक्षा मिळाली आहे.


अमिताभ बच्चन


बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांनाही तगडी सुरक्षा पुरवण्यात आली आहे. बिग बींना मुंबई पोलिसांकडून विशेष सुरक्षा मिळाली आहे. त्यांनाही जीवे मारण्याच्या धमक्या आल्या आहेत, त्यानंतर त्यांच्या जलसा बंगल्यातील सुरक्षा व्यवस्थाही वाढवण्यात आली आहे. बिग बींना वाय प्लस सुरक्षा देण्यात आली असून त्यांच्याकडे सहा पोलिस कमांडो अंगरक्षक आहेत.


कंगना रणौत


बॉलिवूड कॉन्ट्रोवर्सी क्वीन कंगना रणौत कायम वादात असते. कंगना रणौतलाही जीवे मारण्याच्या धमक्या आल्या आहेत. त्यानंतर सरकारने कंगनाला वाय प्लस सुरक्षा दिली आहे. कंगना ही पहिली बॉलिवूड अभिनेत्री आहे, जिला वाय प्लस सुरक्षा देण्यात आली आहे. कंगनाच्या सुरक्षेसाठी 10 ते 12 CRPF जवान नेहमी वेगवेगळ्या शिफ्टमध्ये तैनात असतात.


महत्त्वाच्या इतर बातम्या :


मोठी बातमी : सलमान खानला पनवेलच्या फार्महाऊसवर मारण्याचा प्लॅन, गार्डसोबत मैत्री; शार्प शुटरचा धक्कादायक खुलासा