Kader Khan Struggle Days: बॉलिवूड (Bollywood) स्टार म्हटलं की, लाईमलाईट, पैसा, महागडे ब्रँड्स, त्यांची लाईफस्टाईल... नेहमीच आपलं सर्वांचं लक्ष वेधते. पण, असे अनेक स्टार्स आहेत. ज्यांनी हे सर्व फेम स्वतः मेहनतीनं कमावलं आणि शून्यातून आपलं नाव मोठं केलं. त्यापैकीच एक नाव म्हणजे, ज्येष्ठ अभिनेते कादर खान (Kadar Khan) . आपल्या कॉमेडीनं चाहत्यांना खळखळवून हसवणारे कादर खान यांनी अनेक वर्ष प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं. आपल्या कॉमेडी अंदाजानं कादर खान यांनी सर्वांच्या मनात आपली एक वेगळी छाप सोडली. त्यांचा अभिनय अप्रतिम, पण त्यासोबतच त्यांनी साधलेलं टायमिंगची तर बातच और... कादर खान यांनी अभिनेते गोविंदा यांच्यासोबत अनेक चित्रपट केले. दोघांची जोडी चाहत्यांनी खूपच आवडली. या जोडीला चाहत्यांनी अक्षरशः डोक्यावर घेतलं. कादर खान यांनी खलनायकाच्या भूमिकाही उत्तम निभावल्या. पण, यशाचं सर्वोच्च शिखर गाठणं कादर खान यांच्यासाठी फारसं सोपं नव्हतं. सुरुवातीच्या काळात त्यांचं आयुष्य अत्यंत हलाखीत गेलं. 


कादर खान यांचा जन्म 22 ऑक्टोबर 1937 रोजी झाला. त्यांचा जन्म अफगाणिस्तानातील काबुल इथे झाला. मात्र, नंतर त्याचे आई-वडील त्याला मुंबईत घेऊन आले. मुंबई आल्यानंतर हे कुटुंब झोपडपट्टीत राहू लागलं. त्यांच्या कुटुंबाची परिस्थिती अत्यंत वाईट होती, त्यांनी खूप हलाखीत दिवस काढले. नशीबाचे भोग कमी होते, तेच सावत्र वडिलांचा जाचही कादर खान यांच्या वाट्याला आला होता. त्यांचे सावत्र वडील त्यांना भीक मागायला पाठवायचे. 


कादर खान यांच्या आई-वडिलांचा घटस्फोट झाला. तेव्हा त्यांच्या आईचं जबरदस्तीनं दुसरं लग्न लावलं. ज्या व्यक्तीसोबत त्यांच्या आईचं दुसरं लग्न लावलं, ती व्यक्ती अत्यंत वाईट आणि क्रूर होती. बालपणातच सावत्र वडिलांकडून कादर खान यांचा खूपच छळ केला जायचा. त्यांच्या सावत्र वडिलांनी अनेकदा कादर खान यांना त्यांच्या खऱ्या वडिलांकडे पैसे मागायला सांगितले होते.


अनेकदा उपाशीच झोपले, लहान वयातच शिक्षण सुटलं... 


कादर थान यांनी एका मुलाखतीत बोलताना सांगितलं होतं की, त्यांचं कुटुंब आठवड्यातून तीन दिवस उपाशी झोपायचं. ते गरिबीतून कधी बाहेर पडूच शकले नाही. कादर खान यांनी लहान वयातच शाळा सोडण्याचा निर्णय घेतला होता आणि झोपडपट्टीतील इतर मुलांप्रमाणे स्थानिक मिलमध्ये काम केलं. कुटुंबाला हातभार लावण्यासाठी कादर खान यांनी मोठा निर्णय घेतल्याचं त्यांनीच अनेक मुलाखतींमध्ये बोलताना सांगितलं होतं. त्यांची आई त्यांना अभ्यासासाठी मदरशात पाठवायची, असं देखील कादन खान यांनी एका मुलखातीत बोलताना सांगितलं होतं. 


एका मुलाखतीत बोलताना कादर खान म्हणाले होते की, "माझी आई म्हणायची की, जर तू मजुरी केलीस, तर आयुष्यभर तुझी कमाई 3 रुपये प्रतिदिन असेल. पण, लक्षात ठेव, जर तुला या गरीबीतून बाहेर पडायचं असेल, तर तुला शिकावंच लागेल." आईच्या सल्ल्यानं त्यांनी शाळेत अॅडमिशन घेतलं. त्यानंतर त्यांनी शिकायला पुन्हा सुरुवात केली. पुढे जाऊन ग्रॅज्युएशन पूर्ण केलं. त्यानंतर इंजिनिअरिंगमधून पोस्ट ग्रॅज्युएशन केलं. 


दरम्यान, कादर खान यांच्या चित्रपटांबाबत बोलायचं झालं तर, त्यांनी अंदाज, आँखे, हिरो हिंदुस्थानी, दिल ही तो है, वाह...तेरा क्या कहना, हीरो नंबर 1, मिस्टर एंड मिसेज खिलाडी, दिल है बेताब यांसारख्या असंख्य चित्रपटांमध्ये काम केलं आहे. 


महत्त्वाच्या इतर बातम्या : 


अभिनेत्रीच्या डोक्यावरचे केसे गेलेले पाहून मुलीनं फोडलेला टाहो; 32 कीमो-बोन मॅरो ट्रान्सप्लांट करत कॅन्सरवर यशस्वी मात