Cannes Film Festival : जगभरातील सिनेप्रेमींसाठी महत्त्वाचा असणाऱ्या 'कान्स फिल्म फेस्टिव्हल'ला (Cannes Film Festival 2023) कालपासून सुरुवात झाली आहे. 76 व्या कान्स फिल्म फेस्टिव्हलच्या पहिल्या दिवशी अनेक सेलिब्रिटींनी रेड कार्पेटवर वॉक केला. 16 मे ते 27 मे या कालावधीत कान्स फिल्म फेस्टिव्हल पार पडणार आहे. या फेस्टिव्हलच्या पहिल्या दिवशी काही बॉलिवूड अभिनेत्रींनी देखील रेड कार्पेटवर वॉक केला. जाणून घेऊयात त्या अभिनेत्रींच्या लूकबद्दल...
सारा अली खान (Sara Ali Khan)
कान्स फिल्म फेस्टिव्हलसाठी सारानं देसी लूक केला होता. साराने अबू जानी-संदीप खोसला यांनी डिझाईन केलेला गोल्डन एम्ब्रॉयडरी केलेला लेहेंगा परिधान केला होता. साराच्या या लूकनं अनेकांचे लक्ष वेधले आहे. सध्या साराच्या या लूकची सोशल मीडियावर चर्चा होत आहे.
मानुषी छिल्लर (Manushi Chhillar)
अक्षय कुमारसोबत अलीकडेच बॉलिवूडमध्ये पदार्पण करणारी माजी मिस इंडिया मानुषी छिल्लर हिनं देखील या वर्षी कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये डेब्यू केला. मानुषीनं कान्स फिल्म फेस्टिव्हलसाठी क्लासी लूक केला होता. व्हाईट ड्रेस आणि गळ्यात स्टोनचा नेकलेस असा लूक मानुषीनं कान्स फिल्म फेस्टिव्हलसाठी केला होता.
ईशा गुप्ता (Esha Gupta)
अभिनेत्री ईशा गुप्तानं देखील कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये हजेरी लावली. यावेळी निकोलस जेब्रान कॉउचर गाऊनमध्ये ईशा खूपच सुंदर दिसत होती. ईशाच्या या लूकचं अनेक जण कौतुक करत आहेत.
ऐश्वर्या राय, सनी लिओनी,अनुष्का शर्मा,अदिती राव हैदरी या अभिनेत्री देखील कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये हजेरी लावणार आहेत. 'कान्स फिल्म फेस्टिव्हल 2023'चं आयोजन फ्रान्समधील फ्रेंच रिवेरा येथे करण्यात आलं आहे. या फेस्टिव्हलमध्ये अनेक चांगल्या दर्जाचे सिनेमे दाखवले जाणार आहेत. या फिल्म फेस्टिव्हलच्या रेड कार्पेटवर अनेक सेलिब्रिटी आपल्या अदांनी सर्वांचं लक्ष वेधून घेताना दिसतील.
इतर महत्वाच्या बातम्या: