All That Breathes : 'कान्स चित्रपट महोत्सवा'ची (Cannes 2022) आज सांगता होणार आहे. 75 व्या कान्स चित्रपट महोत्सवात भारतीय सिनेतारकांसह सिनेमांचादेखील दबदबा आहे. कान्स चित्रपट महोत्सवात आता दिग्दर्शक शौनक सेन (Shaunak Sen) यांच्या 'ऑल दॅट ब्रीथ्स' (All That Breathes) या माहितीपटाने गोल्डन आय अवॉर्ड (Golden Eye) पटकावला आहे. 


दिल्लीच्या प्रदूषणावर आधारित माहितीपट


'ऑल दॅट ब्रीथ्स' हा माहितीपट 'कान्स 2022'च्या आधी एचबीओ चॅनलवर दाखवण्यात आला होता. तेव्हा हा माहितीपट प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला होता. आता कान्स चित्रपट महोत्सवात शॉर्ट फिल्म कॅटेगरीत या माहितीपटाला 'गोल्डन आय अवॉर्ड' मिळाला आहे. त्यामुळे या माहितीपटाचे प्रेक्षकांकडून कौतुक होत आहे. गोल्डन आय ज्युरी सदस्य अॅग्निएस्का हॉलंड, इरिना त्सिल्क, पियरे डेलडोनचॅम्प्स आणि अॅलेक्स व्हिसेंट यांनी हा माहितीपट दिल्लीच्या प्रदूषणावर आधारित एक उत्कृष्ट माहितीपट असल्याचे म्हटले आहे.


या वर्षाच्या सुरुवातीला 'ऑल दॅट ब्रीथ्स' या माहितीपटाला फिलाडेल्फिया येथील वर्ल्ड सिनेमा ग्रँड ज्युरी पुरस्कारानेही सन्मानित करण्यात आले आहे. तसेच सनडांस इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हलमध्ये दाखवला जाणारा हा 90 मिनिटांचा एकमेव हिंदी माहितीपट आहे. दोन भावांवर भाष्य करणारा हा माहितीपट आहे.


भारताला पहिल्यांदाच ‘कंट्री ऑफ ऑनर’चा सन्मान


कान्स चित्रपट महोत्सवात भारताला पहिल्यांदाच ‘कंट्री ऑफ ऑनर’चा सन्मान मिळाला आहे. तसेच सहा भारतीय सिनेमांना कान्स फिल्म फेस्टिवलमध्ये मानाचं स्थान मिळालं आहे. या सहा सिनेमांत मराठी सिनेमांचादेखील समावेश आहे. 'पोटरा’ (Potra), ‘कारखानीसांची वारी’ (Karkhanisanchi Wari) आणि ‘तिचं शहर होणं’ (Ticha Shahar Hona), ‘गोदावरी’ (Godavari) या मराठी सिनेमांना 'कान्स फिल्म फेस्टिवल'मध्ये मानाचं स्थान मिळालं आहे. यंदाचा महोत्सव खास आहे. सत्यजित रे यांचा ‘प्रतिद्वंदी’ हा सिनेमादेखील 'कान्स फिल्म फेस्टिवल 2022' मध्ये दाखवला जाणार आहे. 


संबंधित बातम्या


Amruta Fadnavis : 'कान्स चित्रपट महोत्सवा'त अमृता फडणवीसांना पुरस्कार, ट्वीट करत दिली माहिती


Safed First Look : 'सफेद' सिनेमाचा फर्स्ट लूक समोर; ए. आर. रहमान यांच्या हस्ते कान्समध्ये पोस्टर लॉन्च


Cannes Film Festival 2022 : 'कान्स फिल्म फेस्टिवल'मध्ये हिना खानच्या 'कंट्री ऑफ द ब्लाइंड' सिनेमाचे पोस्टर रिलीज