Budget 2023: अर्थमंत्री निर्मला सीतारमण (Finance Minister Nirmala Sitharaman) यांनी आज अर्थसंकल्प (Budget 2023) सादर केला. या अर्थसंकल्पामधून विविध घोषणा करण्यात आली. पण मनोरंजनसृष्टी (Entertainment Sector) संदर्भात या अर्थसंकल्पामध्ये कोणतीही घोषणा करण्यात आलेली नाही. त्यामुळे मनोरंजनसृष्टीमधून नाराजी व्यक्त केली जात आहे. यंदाच्या बजेटमध्ये मनोरंजनसृष्टी संदर्भात काही घोषणा केल्या जातील, अशी अपेक्षा अनेकांना होती पण यंदा मनोरंजनक्षेत्रासाठी अर्थसंकल्पामध्ये कोणतीही घोषणा करण्यात आलेली नाही.
चित्रपट निर्माते अशोक पंडित यांनी एनआयला दिलेल्या मुलाखतीमध्ये सांगितलं, 'हे अत्यंत दुर्दैवी आहे की दरवर्षी बजेटमध्ये मनोरंजनक्षेत्राकडे दुर्लक्ष केलं जातं. बजेटमध्ये ज्याप्रकारे इतर इंडस्ट्रीबद्दल बोललं जातं पण आमच्या इंडस्ट्रीबद्दल काहीच बोललं गेलं नाही'
'आजपर्यंत कोणत्याही सरकारने मनोरंजन क्षेत्राला गांभीर्याने घेतले नाही'
मनोरंजन उद्योगाला अर्थसंकल्पाकडून काय अपेक्षित आहेत? याबद्दल अशोक पंडित यांनी एका मुलाखतीमध्ये त्यांचे मत व्यक्त केले होते. 'आजपर्यंत कोणत्याही सरकारने मनोरंजन क्षेत्राला गांभीर्याने घेतले नाही आणि या क्षेत्राला इतर उद्योगांसारखे महत्त्व दिले जात नाही.', असं ते म्हणाले होते.
ओटीटी सब्सस्क्रिप्शन, मनोरंजन कर, नव्या स्क्रिन्स आणि फिल्म टुरिझम, चित्रपटांचे तिकीटांचे दर याबाबत बजेटमध्ये घोषणा करण्यात येऊ शकतो, असा अंदाज अनेक जण लावत होते. पण मनोरंजनक्षेत्रातबाबत यंदाच्या बजेटमध्ये कोणतीही घोषणा करण्यात आलेली नाही.
देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी यावर्षी यंदाच्या कार्यकाळातील पाचवा अर्थसंकल्प (Budget 2023) सादर केला. मोदी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळातील हा शेवटचा पूर्ण अर्थसंकल्प आहे.
काय स्वस्त ? काय महाग ?
सोने आणि प्लॅटिनमचे बार, तयार रबर, विशेष सिगारेटी, नाफ्था, चांदी या वस्तू महाग होणार आहे, अशी घोषणा अर्थसंकल्पामध्ये करण्यात आली. तसेच कृत्रिम दागिण्यांवरील सीमाशुल्क, इलेक्ट्रिक व इतर वाहनांचे सीमाशुल्क वाढवण्यात आले आहे. सायकली, खेळणी, इलेक्ट्रिक चिमणी, तयार रबर, सिगारेट आणि तंबाखु उत्पादनेही महाग होणार आहेत. यंदाच्या अर्थसंकल्पात आयातीत वस्तू, शेतकी अवजार, टेक्सटाईल, बायोगॅस, इलेक्ट्रिक वाहनांच्या लिथेनियम बॅटरी तयार करणारी यंत्रे. मोबाईल फोन, टिव्ही, इथनॉल, कच्चे ग्लिसरिन स्वस्त होणार आहे. कृत्रिमरित्या तयार करण्यात आलेल्या शिंपल्यांवरचं निर्यात शुल्क तसचं हिऱ्यांच्या शिंपल्यावरील आयात शुल्क, तांब्याच्या भंगारावरील सीमाशुल्क कमी करण्यात आलं आहे.
ही बातमी वाचा:
Budget 2023: 'जलवा है हमारा यहा', 'औकात के बाहर'; बजेटनंतर सोशल मीडियावर मिम्सचा पाऊस