Budget 2023: अर्थमंत्री निर्मला सीतारमण (Nirmala Sitharaman) यांनी आज (1 फेब्रुवारी) देशाचा अर्थसंकल्प (Budget 2023) सादर केला. या अर्थसंकल्पामधून निर्मला सीतारमण यांनी नवी कर रचनेची तसेच विविध योजनांची घोषणा केली. आता नेटकऱ्यांनी या अर्थसंकल्पावर विविध मिम्स तयार केले आहेत. हे मिम्स सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. या मिम्सला अनेक नेटकरी लाइक करत आहेत. तर काही युझर्स या मिम्सवर कमेंट्स देखील करत आहेत. पाहा मिम्स: 


एका नेटकऱ्यानं अर्थसंकल्पावर तयार केलेल्या मिममध्ये मिर्झापूर या सीरिजमधील एक सिन दिसत आहे. हे मिम ट्विटरवर शेअर करण्यात आलं आहे. या ट्वीटमध्ये 'कॉमर्सचे विद्यार्थी दरवर्षी अर्थसंकल्पाच्या दिवशी', असं लिहिलेलं दिसत आहे. तर या मिममध्ये मिर्झापूर सीरिजमधीलअभिनेता दिव्येंदुचा 'जलवा है हमारा यहां' हा डायलॉग लिहिलेला दिसत आहे. अनेक युझर्सनं या मिमला लाइक केलं आहे तर अनेकांनी या मिमवर कमेंट केल्या आहेत. 






मुन्ना भाई एम बी बी एस या संजय दत्तच्या चित्रपटाचे मिम देखील एका नेटकऱ्यानं तयार केलं आहे. या मिममध्ये संजय दत्तचा 'तू समझके अपुन को दिखा देना' हा डायलॉग लिहिलेला दिसत आहे. 







गँग्स ऑफ वासेपूर या चित्रपटातील एका सिनचा फोटोचा वापर करुन एका नेटकऱ्यानं हे मिम तयार केलं आहे. या मिममध्ये  'अब इकॉनॉमिस्ट बनने का टाईम आ गया' हा डायलॉग लिहिलेला दिसत आहे. तसेच गँग्स ऑफ वासेपूरमधील अभिनेता मनोज वाजपेयीचा फोटो देखील या मिममध्ये दिसत आहे. हे मिम सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 


















वाचा इतर महत्वाच्या बातम्या:


Budget 2023: अर्थसंकल्पावर विवेक अग्रिहोत्री यांची प्रतिक्रिया; म्हणाले, 'हा अर्थसंकल्प अत्यंत...'