Ranbir Alia Kesariya Song Troll : प्रसिद्ध अभिनेता रणबीर कपूर (Ranbir Kapoor) आणि  आलिया भट्ट (Alia Bhatt) यांचा 'ब्रह्मास्त्र'(Brahmastra)  हा चित्रपट लवकरच रिलीज होणार आहे. या चित्रपटामधील केसरिया (Kesariya) या गाण्याचा टिझर रणबीर आणि आलिया यांच्या लग्नाच्या आधी रिलीज करण्यात आला. काल (17 जुलै) केसरिया हे संपूर्ण गाणं रिलीज झाला. या गाण्याला काही लोकांची पसंती मिळाली तर काहींनी या गाण्याला ट्रोल केलं. काही मजेशीर मीम्स सोशल मीडियावर शेअर करुन काही नेटकऱ्यांनी या गाण्याला ट्रोल केलं आहे.  

Continues below advertisement


या ओळीमुळे केसरिया गाणं ट्रोल होत आहे
रणबीर आणि आलियाच्या ब्रह्मास्त्र चित्रपटातील केसरिया या गाण्याचा टीझर रिलीज झाल्यानंतर 'केसरिया तेरा इश्क है पिया' या ओळीनं अनेकांची मनं जिंकली. पण आता हे पूर्ण गाणं रिलीज झाल्यानंतर 'लव्ह स्टोरियां' या गाण्यातील ओळीमुळे अनेक नेटकरी या गाण्याला ट्रोल करत आहेत. 


नेटकऱ्यांनी केलं ट्रोल 
केसरिया गाण्याला ट्रोल करत एका नेटकऱ्यानं लिहिलं, ''केसरिया तेरा इश्क' ही ओळ बिर्याणीमधील इलायची सारखी आहे.' तर दुसऱ्या युझरनं सोशल मीडियावरील पोस्टमध्ये लिहिलं, 'या गाण्यातील सर्वात खराब 'लव्ह स्टोरियां' ही ओळ आहे.'


पाहा मीम्स


















‘केसरिया’ हे गाणे प्रसिद्ध गायक अरिजित सिंह याने गायले आहे. त्याचबरोबर या गाण्याचे संगीत प्रीतमने दिले आहे. या गाण्याचे बोल अमिताभ भट्टाचार्य यांनी लिहिले आहेत. आलिया आणि रणबीरच्या केसरिया या गाण्याला गेल्या आठ तासांमध्ये 85 लाखांपेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले आहे. तर या गाण्याला युट्युबवर  9.7 लाख पेक्षा जास्त लोकांनी लाइक केलं आहे. 


‘ब्रह्मास्त्र’ हा चित्रपट 9 सप्टेंबरला रिलीज होणार आहे. रणबीर कपूर, आलिया भट्ट यांच्यासोबतच अमिताभ बच्चन, मौनी रॉय आणि दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील दिग्गज अभिनेता नागार्जुन हे कलाकार या चित्रपटात प्रमुख भूमिका साकारणार आहेत.  या चित्रपटातून रणबीर आणि आलियाची जोडी पहिल्यांदाच मोठ्या पडद्यावर एकत्र दिसणार आहे.


हेही वाचा:


Kesariya Song Released: आलिया-रणबीरच्या प्रेमाची कहाणी, ‘ब्रह्मास्त्र’चं ‘केसरिया’ गाणं प्रेक्षकांच्या भेटीला!