Brahmastra Box Office Collection Day 6 : बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री आलिया भट्ट (Alia Bhatt) आणि अभिनेता रणबीर कपूर (Ranbir Kapoor) यांचा ब्रह्मास्त्र (Brahmastra) हा चित्रपट गेल्या काही दिवसांपासून बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. या चित्रपटाचे शो हे हाऊसफुल झाले आहेत. या चित्रपटानं केवळ देशभरातच नाही तर जगभरातील प्रेक्षकांची पसंती मिळवली आहे. ब्रह्मास्त्र चित्रपट रिलीज होऊन केवळ सहा दिवस झाले आहे. सहा दिवसामध्ये या चित्रपटानं जवळपास 161 कोटींपेक्षा जास्त कमाई केली आहे. 


सहा दिवसात ब्रह्मास्त्रनं केलेली कमाई 
रिलीज झाल्यानंतर पहिल्या दिवशी या चित्रपटानं 37 कोटींची कमाई केली. तर दुसऱ्या दिवशी या चित्रपटानं 42 कोटींची कमाई केली. रविवारी या चित्रपटानं  45 कोटी कमावले.  चौथ्या दिवशी या चित्रपटानं 16 कोटींची कमाई केली आहे. पाचव्या दिवशी म्हणजेच मंगळवारी (13 सप्टेंबर)  या चित्रपटानं जळपास 12.50 कोटींची कमाई केली आहे. तर बुधवारी (14 सप्टेंबर) 11 कोटींची कमाई या चित्रपटानं केली आहे. 


चित्रपटामध्ये आलिया आणि रणबीरसोबतच अमिताभ बच्चन, नागार्जुन आणि मौनी रॉय या कलाकारांनी देखील प्रमुख भूमिका साकारली आहे. तसेच शाहरुख खान आणि दीपिका पादुकोणनं या चित्रपटामध्ये छोटी पण महत्त्वाची भूमिका साकारली आहे. दीपिकानं या चित्रपटानं रणबीरच्या आईची भूमिका साकारली आहे. सध्या सोशल मीडियावर ब्रह्मास्त्र चित्रपटातील शाहरुख आणि दीपिकाच्या लुक्सचे फोटो व्हायरल होत आहेत. ब्रह्मास्त्र या चित्रपटातील 'केसरिया', देवा देवा या गाण्यांना प्रेक्षकांची पसंती मिळाली. अयान मुखर्जीने या सिनेमाचं दिग्दर्शन केलं आहे. काही दिवसांपासून बॉयकॉट ब्रह्मास्त्र हा ट्रेंड सोशल मीडियावर व्हायरल झाला होता.


चित्रपट रिलीज होण्याआधी सोशल मीडियावर बॉयकॉट ब्रह्मास्त्र हा ट्रेंड सुरु झाला होता. या चित्रपटावर बहिष्कार टाकण्याची मागणी नेटकरी करत होते.  या ट्रेंडाचा चित्रपटाच्या कलेक्शनवर परिणाम होईल, असं म्हटलं जात होतं. पण सध्या हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करत आहे.


वाचा इतर महत्त्वाच्या बातम्या :