TOP 10 Entertainment News : दिवसभरातील दहा महत्त्वाच्या मनोरंजनविषयक बातम्या -


जॅकलीन फर्नांडीसच्या अडचणीत वाढ


बॉलिवूड अभिनेत्री जॅकलीन फर्नांडीस सध्या सुकेश चंद्रशेखर मनी लॉंड्रिंग प्रकरणी चर्चेत आहे. जॅकलीनला ईडीने (आज) 14 सप्टेंबरला न्यायालयात हजर राहण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार जॅकलीन आज न्यायालयात चौकशीसाठी हजर राहिली. एक नव्हे, दोन नव्हे तर तब्बल आठ तास जॅकलीनची चौकशी सुरू होती.


16 सप्टेंबर नाही तर 'या' दिवशी साजरा होणार 'राष्ट्रीय चित्रपट दिवस'


मल्टीप्लेक्स असोसिएशन ऑफ इंडियानं मंगळवारी एक मोठा निर्णय घेतला आहे. मल्टीप्लेक्स असोसिएशन ऑफ इंडियानं ट्विटरवर एक ट्वीट करुन माहिती दिली आहे की, 'राष्ट्रीय चित्रपट दिवस' हा 16 सप्टेंबरला नाही तर  23 सप्टेंबर रोजी साजरा करण्यात येणार आहे. आधी मल्टीप्लेक्स असोसिएशन ऑफ इंडियानं 16 सप्टेंबर रोजी  'राष्ट्रीय चित्रपट दिवस'  साजरा केला जाणार आहे, अशी माहिती दिली होती पण हा निर्णय आता त्यांनी बदलला आहे.


'ब्रह्मास्त्र'ची बॉक्स ऑफिसवर जादू कायम


'ब्रह्मास्त्र' सिनेमाने रिलीजच्या पाचव्या दिवशी म्हणजेच मंगळवारी (13 सप्टेंबर)  जळपास 12.50 कोटींची कमाई केली आहे. चौथ्या दिवशी या चित्रपटानं 16 कोटींची कमाई केली आहे.रिलीज झाल्यानंतर पहिल्या दिवशी या चित्रपटानं 37 कोटींची कमाई केली. तर दुसऱ्या दिवशी या चित्रपटानं 42 कोटींची कमाई केली. रविवारी या चित्रपटानं  45 कोटी कमावले. पाच दिवसांमध्ये या चित्रपटानं जवळपास 152.50 कोटींची कमाई केली आहे.


'लिटील थिंग्स'चा येणार प्रिक्वल


'लिटील थिंग्स' या वेबसीरिजने लोकप्रियतेचं शिखर गाठलं आहे. युट्यूबवर ही वेबसीरिज प्रदर्शित झाली होती. पण या वेबसीरिजची लोकप्रियता पाहता ती नेटफ्लिक्सवरदेखील प्रदर्शित झाली. या वेबसीरिजच्या शेवटच्या सीझनमध्ये ध्रुव आणि काव्या लग्नबंधनात अडकले असल्याचं दाखवण्यात आलं होतं. पण आता या वेबसीरिजचा प्रिक्वल लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.


कुणीतरी येणार येणार गं! आलियाचं 'डोहाळे जेवण'; बाळाच्या स्वागताला आजी सज्ज


बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत आहे. तिचा 'ब्रह्मास्त्र' सिनेमा सध्या बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालतो आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी आलिया बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूरसोबत लग्नबंधनात अडकली आहे. सध्या आलिया 'ब्रह्मास्त्र'सह प्रेग्नन्सीमुळे चर्चेत आहे. लवकरच तिचा डोहाळे जेवणाचा कार्यक्रम होणार आहे.  


'मन कस्तुरी रे' चित्रपटातील तेजस्वी प्रकाशचा फर्स्ट लूक रिलीज


'मन कस्तुरी रे' या चित्रपटातील तेजस्वीचा 'फर्स्ट लूक' रिलीज झाला आहे. यातून तिचा बबली आणि रॉकिंग अंदाज प्रेक्षकांसमोर आला आहे. 'श्रुती' असं तिच्या चित्रपटातील भूमिकेचं नाव आहे. नितीन केणी यांच्या 'मुंबई मुव्ही स्टुडिओ'ची प्रस्तुती असलेला हा चित्रपट 4 नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येतो आहे.


'थँक गॉड' चित्रपट अडकला वादाच्या भोवऱ्यात


दिग्दर्शक इंद्र कुमार यांचा आगामी चित्रपट 'थँक गॉड' हा सध्या चर्चेत आहे. या चित्रपटामध्ये अभिनेता  अजय देवगण, सिद्धार्थ मल्होत्रा आणि अभिनेत्री रकुलप्रीत सिंह या कलाकारांनी प्रमुख भूमिका साकारली आहे. काही दिवसांपूर्वी या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला. ट्रेलर रिलीज झाल्यानंतर आता हा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. 


बिग बॉस मराठीचं घर यंदा निर्बंधमुक्त असेल का?


'बिग बॉस मराठी'च्या चौथ्या सीझनचा प्रोमो आऊट झाल्यापासून प्रेक्षक या कार्यक्रमाची प्रतीक्षा करत आहेत. येत्या दोन ऑक्टोबरपासून प्रेक्षकांना त्यांचा लाडका कार्यक्रम पाहायला मिळणार आहे. पण आता बिग बॉसच्या घरात सहभागी होण्यासाठी स्पर्धकांना आरटीपीसीआर टेस्ट करावी लागणार असल्याची माहिती समोर आली आहे. 


'हरिओम' चा लक्षवेधी मोशन पोस्टर रिलीज


महाराष्ट्राचे आराध्यदैवत, आदरस्थान श्री छत्रपती शिवाजी महाराज ह्यांचे उमरठचे दोन वीर बंधू मावळे  सिंह तान्हाजी आणि सूर्याजी यांच्या बंधूप्रेम व शिवप्रेमाला प्रेरित झालेल्या दोन भावंडांची  कथा मांडणारा 'हरिओम' हा चित्रपट लवकरच येतोय प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. 


'ब्रह्मास्त्र'च्या यशानंतर आता 'ब्रह्मास्त्र 2'ची आतुरता!


मीडिया रिपोर्ट्सनुसार दुसऱ्या भागात रणवीर सिंह, दीपिका पदुकोण आणि हृतिक रोशन झळकणार आहेत. 'ब्रह्मास्त्र'च्या यशानंतर चाहते याचा दुसरा आणि तिसरा भाग कधी प्रदर्शित होणार, असा सवाल करत आहेत. तर 'ब्रह्मास्त्र 2' हा सिनेमा 2023 मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.