Brahmastra Advance Booking : बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर (Ranbir Kapoor) आणि आलिया भट्टचा (Alia Bhatt) आगामी 'ब्रम्हास्त्र' (Brahmastra) सिनेमा 9 सप्टेंबरला सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे. रिलीजआधीपासूनच हा सिनेमा वेगवेगळ्या कारणांमुळे चर्चेत आहे. शुक्रवारी या सिनेमाच्या अॅडव्हान्स बुकिंगला सुरुवात झाली असून सिनेमाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. कोरोना महामारीनंतर हा सिनेमा चांगली कमाई करू शकतो अशी शक्यता वर्तवली जात आहे.
'ब्रम्हास्त्र' हा सिनेमा सिनेमागृहात चांगलाच धुमाकूळ घालणार आहे. रिलीजआधीच या सिनेमाने 10 हजार कोटींची कमाई केली आहे. 'ब्रम्हास्त्र' सिनेमाचे पहिल्या दिवशी 11,558 तिकिटं विकली गेली आहेत. 'केजीएफ 2' या सिनेमाचादेखील 'ब्रम्हास्त्र' सिनेमा रेकॉर्ड मोडू शकतो असेही म्हटले जात आहे.
9 सप्टेंबरला सिनेमा येणार प्रेक्षकांच्या भेटीला
‘ब्रह्मास्त्र’ चित्रपटाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत. ‘ब्रह्मास्त्र’ 9 सप्टेंबरला सिनेमागृहात रिलीज होणार आहे. बॉलिवूड स्टार रणबीर कपूर, आलिया भट्ट, अमिताभ बच्चन, मौनी रॉय आणि दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील दिग्गज अभिनेता नागार्जुन यांचाही या मल्टीस्टारर चित्रपटात समावेश आहे. या सिनेमाच्या माध्यमातून रणबीर आणि आलियाची जोडी पहिल्यांदाच मोठ्या पडद्यावर एकत्र दिसणार आहे.
अयान मुखर्जीने ‘ब्रह्मास्त्र’ या सिनेमाचे दिग्दर्शन केले आहे. रिलीजआधीच या सिनेमाने रेकॉर्ड करायला सुरुवात केली आहे. 'ब्रह्मास्त्र' सिनेमातील 'केसरिया' (Kesariya) गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे. या गाण्याने सर्वाधिक व्ह्यूजचा रेकॉर्ड केला आहे. अरिजीत सिंहने हे गाणं गायलं आहे. तर प्रीतमने संगीतबद्ध केलं आहे. तसेच या गाण्याचे बोल अमिताभ भट्टाचार्यने लिहिले आहेत.
संबंधित बातम्या