Sa Re Ga Ma Pa Lil Champs 2022 : गेल्या काही दिवसांपासून अनेक रिअॅलिटी शो प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. 'सा रे ग म प' लिटिल चॅम्प्स' (Sa Re Ga Ma Pa Lil Champs) हा छोट्या पडद्यावरील लोकप्रिय कार्यक्रम आहे. लवकरच या बहुचर्चित कार्यक्रमाचे नववे पर्व प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 


शंकर महादेवन करणार परीक्षण


'सा रे ग म प' लिटिल चॅम्प्स'च्या नवव्या पर्वाचे परीक्षण शंकर महादेवन (Shankar Mahadevan) करणार आहेत. या कार्यक्रमाच्या माध्यमातून अनेक कलाकारांना त्यांची कला प्रेक्षकांना दाखवण्याची संधी मिळणार आहे. 'सा रे ग म प' लिटिल चॅम्प्स'चे आठही पर्व प्रेक्षकांच्या पसंतीस उतरले आहेत. त्यामुळे प्रेक्षक आता नवव्या पर्वाची आतुरतेने वाट पाहत आहेत. 


शंकर महादेवन यांनी आजवर अनेक गाणी गायली आहेत. संगीतक्षेत्रात त्यांचे नाव अभिमानाने घेतलं जातं. 'सा रे ग म प' लिटिल चॅम्प्स'चे परीक्षण केल्याबद्दल शंकर महादेवन म्हणाले,"सा रे ग म प' लिटिल चॅम्प्स'चा मी भाग होत असल्याचा मला आनंद आहे. मी 'सा रे ग म प' या लोकप्रिय कार्यक्रमाचे परीक्षण करणं ही माझी इच्छा होती. 'सा रे ग म प'च्या मंचावरून कलाकारांच्या कलेला वाव देण्यात येतो. लहान मुलांना चांगल्या पद्धतीने मार्गदर्शन करणं ही आता माझी जबाबदारी असणार आहे". 


'सा रे ग म प' लिटिल चॅम्प्स'च्या ऑडिशनला सुरुवात


'सा रे ग म प' लिटिल चॅम्प्स'चा नववा सीझन खूपच मनोरंजनात्मक असणार आहे. या कार्यक्रमाच्या ऑडिशनलादेखील आता सुरुवात झाली आहे. 'सा रे ग म प' लिटिल चॅम्प्स'साठी खास ऑनलाइन ऑडिशनदेखील घेण्यात येत आहेत. 2 ऑगस्टपासून मुंबई, दिल्ली, कोलकाता, नागपूर, लखनऊ, इंदौर, जयपूर आणि चंढीगढमध्ये ऑडिशनला सुरुवात झाली आहे. झी टीव्हीवर प्रेक्षकांना चवकरच हा कार्यक्रम पाहायला मिळणार आहे. 


संबंधित बातम्या


Movies : मनोरंजनसृष्टीला ग्रहण; सिनेमागृहांकडे प्रेक्षकांनी फिरवली पाठ


Indian Idol 13 Promo : 'इंडियन आयडॉलचा 13' लवकरच होणार सुरू; प्रोमो आऊट