बॉलिवूडचे प्रसिद्ध अभिनेते बोमन इराणी यांची आई जेरबानू इराणी यांचे बुधवारी निधन झाले. त्या 94 वर्षांच्या होत्या. बोमन इराणी यांनी इंस्टाग्रामच्या माध्यमातून ही माहिती दिली. त्यांनी इन्स्टाग्रामवर एक भावनिक पोस्ट शेअर केली आहे. आईचे छायाचित्र शेअर करताना त्यांनी लिहिले आहे की, "आज सकाळी झोपेत आईचं निधन झालं. ती 94 वर्षांची होती. तिने माझ्यासाठी आई आणि वडील दोघांच्याही भूमिका निभावल्या."



आईचा फोटो शेअर करताना लिहलंय की, "आज सकाळी झोपेत आईचे निधन झाले. ती 94 वर्षांची होती. तिने माझ्यासाठी आई व वडील दोघांचीही भूमिका साकारली." त्यांनी पुढे लिहलंय, की "मजेशीर गोष्टी फक्त तीच सांगू शकते, जेव्हा तिने मला चित्रपटांमध्ये पाठवले तेव्हा तिने सर्व कंपाऊंडमधील मुले माझ्यासोबत येतील आणि त्यांच्यासाठी मी न विसरता पॉपकॉर्न आणण्यास सांगितलं."






बोमन यांनी पुढे असे लिहिले, "तिला तिचे जेवण आणि तिची गाणी खूप आवडत होती. एक क्षणात विकिपीडिया आणि आयएमडीबीची फॅक्ट चेक करत होती. ती नेहमी म्हणायची की तू असा अभिनेता नाही, जे तुझं काम पाहून फक्त कौतुक करतील. तर असा अभिनेता हो, जेणेकरुन लोक तुझ्या कामामुळे मनसोक्त हसतील. ती म्हणाली होती लोकांना आनंदी ठेव. काल रात्री तिने मलाई कुल्फी आणि काही आंबे मागितले होते. तिला हवे असल्यास चंद्र आणि तारे मागू शकली असती. ती नेहमीच एक स्टार होती आणि नेहमीच असेल. "


बोमन लवकरच '' 83 'चित्रपटात दिसणार
बोमन इराणी बऱ्याच काळापासून चित्रपटांपासून दूर आहेत. पण लवकरच ते मोठ्या पडद्यावर दिसणार आहे. बोमन लवकरच कबीर खानच्या '83 चित्रपटात दिसणार आहे, ज्यात ते भारताचा महान यष्टीरक्षक-फलंदाज फारूक इंजीनियरची भूमिका साकारत आहे. यशराज फिल्म्सच्या आगामी 'जयेशभाई जोरदार' या कॉमेडी चित्रपटातही ते लवकरच दिसणार आहे.