मुंबई: 'एक महल हो सपनोंका' असे मुंबईत येणाऱ्या प्रत्येकालाच वाटत असते, मग तो सामान्य व्यक्ती असो वा बॉलिवूड स्टार. जान्हवी कपूर, ऋतिक रोशन, अलिया भट्ट या सारख्या कित्येक स्टार्सनी मुंबईतील आपल्या घराचे स्वप्न पूर्ण केलं आहे. आता या पंक्तीत अजून एका नावाचा समावेश झाला आहे. अभिनेत्री सोनाक्षी सिन्हानेही मुंबईतील आपल्या घराचे स्वप्न पूर्ण केलं असून वांद्रे भागात तिने 4 BHK फ्लॅटची खरेदी केली आहे.
नवीन वर्षाची सुरुवात अनेक बॉलिवूड स्टार्ससाठी चांगली झाल्याचं पहायला मिळतंय. काही स्टार्सनी लग्न केलं तर काहींनी आपली इतर स्वप्ने पूर्ण केलीत. अभिनेत्री सोनाक्षी सिन्हाला आपल्या स्वत:च्या कमाईतून मुंबईत घर खरेदी करायचं होतं. आता तिचे हे स्वप्न पूर्ण झालं आहे.
SSR Birthday: सुशांतच्या जन्मदिनी कंगनाने समजावली त्याच्या मृत्यूची क्रोनोलॉजी
स्वत:च्या कमाईचं मुंबईत एक घर असावं अशी अनेक वर्षापासूनची सोनाक्षीची इच्छा होती. एका मुलाखतीत सोनाक्षीने हे सांगितलं होतं. वयाची 30 वर्षे पूर्ण करण्याआधी घर खरेदी करणे हे स्वप्न असल्याचं सोनाक्षी म्हणाली होती. ही कालमर्यादा सोनाक्षी पाळू शकली नाही पण घर खरेदीचं तीचं स्वप्न मात्र पूर्ण झालं आहे.
सध्या सोनाक्षी तिच्या परिवारासोबत जुहू येथे 'रामायण' नावाच्या बंगल्यात राहते. शत्रुघ्न सिन्हा या घराचा उपयोग आपल्या ऑफिससाठीही करतात. या घराची खरेदी त्यांनी 1972 साली केली होती. सध्यातरी सोनाक्षी आपल्या नव्या घरात शिफ्ट होणार नाही.