Bollywood top 3 Villains: कोणत्याही चित्रपटातील नायक-नायिका लोकांना कितीही आवडत असली तरी त्यात खलनायक नसेल तर चित्रपट पाहण्यात अजिबात मजा नाही. कारण प्रेक्षकांना खिळवून ठेवण्यात खलनायकाचा महत्त्वाचा वाटा असतो. खलनायक धोकादायक असेल तर तो चित्रपट पाहण्याची लोकांमध्ये क्रेझ वाढते. बॉलिवूडमध्ये खलनायक म्हटले की अमजद खान आणि अमरीश पुरी यांचा चेहरा समोर येतो. पण, असे काही कलाकार आहेत, ज्यांनी अभिनेता म्हणून काम करताना खलनायकाच्या भूमिकेत रंग भरले.
बॉलीवूडमधील सर्वात भयानक खलनायक कोण आहे?
चित्रपटांमध्ये असणारा खलनायक जेवढा ताकदीचा, भयंकर असेल तेवढेच चित्रपट पाहण्यास मज्जा येते. चित्रपटातील नायका ऐवढंच महत्त्व हे खलनायकाचे असते. काही चित्रपटांमध्ये खलनायकी व्यक्तीरेखांनी आपली छाप सोडली आहे. काही खलनायकी व्यक्तीरेखा अजूनही लोकांच्या लक्षात आहेत.
'सरफरोश'चा खलनायक
1999 मध्ये प्रदर्शित झालेल्या 'सरफरोश' चित्रपटाचे दिग्दर्शन जॉन मॅथ्यू मॅथन यांनी केले होते. या चित्रपटात आमिर खानने पोलिस अधिकाऱ्याची भूमिका साकारली होती. सोनाली बेंद्रेने त्याच्या प्रेयसीची भूमिका साकारली होती. या चित्रपटात मुख्य खलनायकाची भूमिका नसिरुद्दीन शाह यांनी केली होती.
साधारपणे चित्रपटात खलनायक हा आरडाओरड करताना, दात-ओठ खाताना दिसतो. मात्र, या चित्रपटात शांत पण कपटी, कटकारस्थाने रचणारा दाखवला आहे. हा खलनायक प्रसिद्ध गायक आहे, गझल गातो, लोकांची मने जिंकतो. पण चित्रपटाच्या मध्यतरानंतरही तोच खलनायक आहे, हे कळत नाही. नसिरुद्दीन शहा हे प्रचंड ताकदीचे अभिनेते आहेत. त्यांनी ही व्यक्तीरेखा चांगल्या प्रकारे साकारली आहे. हा चित्रपट प्राईम व्हिडीओवर पाहता येऊ शकतो.
'संघर्ष' मधील खलनायक
1999 मध्ये रिलीज झालेला 'संघर्ष' हा चित्रपट तनुजा चंद्रा यांनी दिग्दर्शित केला होता. अक्षय कुमार आणि प्रीती झिंटा या चित्रपटात मुख्य भूमिका होती. परंतु चित्रपट हिट होण्याचे अर्ध्याहून अधिक श्रेय त्याच्या खलनायकाला म्हणजेच आशुतोष राणाला गेले. आशुतोष राणाने या चित्रपटात खलनायकाची इतकी भयानक भूमिका साकारली होती की त्या काळातील मुलेही त्याला घाबरू लागली होती.
आशुतोष राणाने 'दुष्मन' (1998) या चित्रपटात खलनायकाची भूमिकाही साकारली होती, तीही खूप भयानक होती. हे दोन चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर 90 च्या दशकातील मुलांना त्याची भीती वाटू लागली आणि हेच त्याच्या जबरदस्त अभिनयाचे उदाहरण आहे. हा चित्रपट तुम्ही यूट्यूबवर मोफत पाहू शकता.
'मर्डर 2' मधील खलनायक
2011 मध्ये रिलीज झालेल्या मर्डर-2 या चित्रपटाचे दिग्दर्शन मोहित सुरी याने केले होते. या चित्रपटात आ इम्रान हाश्मीची प्रमुख भूमिका होती. चित्रपटातील गाणीदेखील गाजली होती. पण, या चित्रपटात खलनायकाने छाप सोडली. अभिनेता प्रशांत नारायण याने खलनायकाची भूमिका साकारली होती. प्रशांत नारायण हा चित्रपटात सायको किलर असतो. यात तो मुलींच्या हत्या करत असतो.
या चित्रपटामुळे प्रशांत नारायणची चांगलीच चर्चा रंगली. त्याने याआधीदेखील खलनायकाची भूमिका साकारली होती. पण, 'मर्डर-2'मधील भूमिका चांगलीच गाजली. हा चित्रपट प्राईम व्हिडीओवर पाहता येईल.