Bollywood Movies Sequels : सध्या बॉलिवूडमध्ये अनेक बिग बजेट सिनेमांचा सिक्वेल आणि रीमेक येत आहे. तर दुसरीकडे अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींचे सिनेमे फ्लॉप होत आहेत. 2007 साली प्रदर्शित झालेल्या 'भूल भुलैया' सिनेमाचा 'भूल भुलैया 2' सिक्वेल आहे. हा सिनेमा सध्या सिनेमागृहात धुमाकूळ घालत आहे. आतापर्यंत या सिनेमाने 161 कोटींची कमाई केली आहे. लवकरच अनेक बॉलिवूड सिनेमांचे सिक्वेल प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत.
एक विलेन रिटर्न्स
'एक विलेन रिटर्न्स' हा रोमॅंटिक सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 2014 साली प्रदर्शित झालेल्या 'एक विलेन'चा हा सिक्वेल आहे. 'एक विलेन रिटर्न्स' हा रोमॅंटिक, अॅक्शन, थ्रिलर सिनेमा आहे. 'एक विलेन' या सिनेमात श्रद्धा कपूर, सिद्धार्थ मल्होत्रा आणि रितेश देशमुख मुख्य भूमिकेत होते. या सिनेमाने जगभरात 170 कोटींची कमाई केली होती. तर आता 'एक विलेन रिटर्न्स' सिनेमात जॉन अब्राहम, अर्जुन कपूर, दिशा पटानी आणि तारा सुतारिया मुख्य भूमिकेत आहेत. हा सिनेमा 29 जुलै 2022 ला सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे.
टायगर 3
'एक था टायगर' हा सिनेमा 2012 साली प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. तर 'टायगर जिंदा है' हा सिनेमा 2017 साली प्रदर्शित झाला होता. आता 'टायगर 3' हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 'एक था टायगर'ने जगभरात 320 कोटींची कमाई केली होती. तर 'टायगर जिंदा है' या सिनेमाने 550 कोटींचा गल्ला जमवला होता. पुढल्या वर्षात 'टायगर 3' हा सिनेमा सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे. या सिनेमात कतरिना कैफ, सलमान खान आणि इमरान हाश्मी मुख्य भूमिकेत आहेत.
दोस्ताना 2
करण जोहरच्या 2008 साली प्रदर्शित झालेल्या 'दोस्ताना' सिनेमाचा सिक्वेल लवकरच प्रदर्शित होणार आहे. या सिनेमात कार्तिक आर्यन, जान्हवी कपूर आणि लक्ष्य लालवानी दिसणार आहेत. नवजोत गुलाटी, सुमित अरोडा, ऋषभ शर्मा आणि डीकुन्हाने या सिनेमाचे लेखन केलं आहे. तर 'दोस्ताना'मध्ये प्रियंका चोप्रा, जॉन अब्राहम आणि अभिषेक बच्चन मुख्य भूमिकेत होते. या सिनेमाने जगभरात 87 कोटींचा गल्ला जमवला होता. आता या सिनेमाचा सिक्वेल पाहण्याची चाहते प्रतीक्षा करत आहेत.
फुकरे 3
'फुकरे' हा सिनेमा 2013 साली प्रदर्शित झाला होता. त्यानंतर 2017 साली ‘फुकरे रिटर्न्स’ हा सिनेमा प्रदर्शित झाला. आता 'फुकरे 3' हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. मार्चमध्ये या सिनेमाच्या शूटिंगला सुरुवात झाली आहे. या सिनेमात पुलकित सम्राट, मनजोत, वरुण शर्मा आणि ऋचा चड्ढा मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. प्रेक्षक या सिनेमाची आतुरतेने वाट पाहत आहेत.
संबंधित बातम्या