Spider-Man: No Way Home Trailer: स्पायडर मॅन : नो वे होमचा (Spider-Man: No Way Home Trailer) ट्रेलर रिलीज झाला आहे. चित्रपटाचा ट्रेलर एक दिवस आधीच सोशल मीडियावर लीक झाला होता. पण आता त्याचा अधिकृत ट्रेलर रिलीज झाला आहे. चित्रपटाचा ट्रेलर सस्पेन्सने भरलेला आहे. डॉ. स्ट्रेंज आणि स्पायडरमॅन यांच्यातील लढा हे ट्रेलरचे मुख्य आकर्षण आहे.


ट्रेलरमध्ये दाखवण्यात आले आहे की स्पायडर मॅनची ओळख सर्वांना माहित झाली आहे. पोलीस त्याची चौकशीही करत आहेत. पीटर पार्करच्या 'स्पायडरमॅन: फार फ्रॉम होम'मध्ये तो जगासमोर आपली ओळख उघड केल्यानंतर अडचणींना सामोरे जाताना दिसतो. दुसरीकडे, Zendaya MJ त्याचं सांत्वन करण्याचा प्रयत्न करताना दिसत.


स्पायडर मॅन: नो वे होम या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच ऑनलाइन लीक झाला आहे. त्यानंतर चित्रपटाचे निर्माते खूप अस्वस्थ दिसत आहेत. हा ट्रेलर ऑनलाईन साइट्सवरून काढण्यासाठी ते खूप मेहनत घेत आहेत. याचे बरेच व्हिडिओ चाहत्यांनी YouTube आणि इतर अनेक प्लॅटफॉर्मवर ठेवले आहेत. सोनी पिक्चर्स मूव्हीज आणि शो ची सामग्री असल्याचे सांगत सध्या, हे सर्व व्हिडिओ काढून टाकण्यात आले आहेत. कॉपीराइटच्या आधारावर हे सर्व व्हिडीओ ब्लॉक करण्यात आले आहेत.


ट्रेलर पहा..




अनेकांनी लीक झालेला ट्रेलर शेअर केला
इन्स्टाग्राम आणि इतर पोर्टलवरील काही पेज अजूनही लीक झालेला ट्रेलर होस्ट करताना दिसत आहेत. हा व्हिडिओ मोबाईल स्क्रीन रेकॉर्डिंगचा आहे. ज्यावर ट्रेलर चालवला जात आहे. यामध्ये स्क्रीनवर एक मोठा वॉटरमार्कही दिसत आहे.


सोशल मीडियावर लिक झालेला ट्रेलर






या नाताळच्या दिवशी चित्रपट प्रदर्शित होणार
मोठ्या पडद्यावर, टोबे मागुइरेने सर्वप्रथम चित्रपट निर्माता सॅम रायमीच्या स्पायडर-मॅन (2002), स्पायडर-मॅन 2 (2004) आणि स्पायडर-मॅन 3 (2007) मध्ये पीटर पार्करची भूमिका केली. त्याच्या नंतर, अँड्र्यू गारफील्डने द अमेझिंग स्पायडर-मॅन (2012) आणि द अमेझिंग स्पायडर-मॅन 2 (2014) मध्ये सुपरहिरोची भूमिका केली. त्याचवेळी, आधी अशी अफवा पसरली होती की दोघेही नो वे होममध्ये एकत्र दिसतील. नो वे होम डिसेंबरमध्ये रिलीज होणार असल्याची माहिती आहे.