Babil Khan ON IIFA 2023 : 'आयफा 2023' (IIFA 2023) या नुकत्याच पार पडलेल्या पुरस्कार सोहळ्यात दिवंगत अभिनेते इरफान खान (Irrfan Khan) यांच्या मुलाला बाबिल खानला (Babil Khan) 'काला' (Qala) या सिनेमासाठी पुरस्कार मिळाला आहे. 'आयफा पुरस्कार 2023'मध्ये बाबिलला सर्वोत्कृष्ट पदार्पण (पुरुष) या कॅटेगरीतील पुरस्कार मिळाला आहे.
'आयफा 2023'च्या मंचावर पुरस्कार स्विकारताना बाबिल म्हणाला,"आता पुन्हा मागे वळून पाहायचं नाही. पुढचा पल्ला गाठण्यासाठी आणखी मेहनत करायचं मी ठरवलं आहे. आता 'आयफा' पुरस्कार सोहळ्यात सर्वोत्कष्ट अभिनेत्याच्या पुरस्कारावर नाव कोरण्यासाठी मला तुमचा आशीर्वाद हवा आहे".
इरफान खान यांच्या आठवणीत बाबिल खान भावूक
आयफा पुरस्कार स्विकारल्यानंतर इरफान खान यांच्या आठवणीत बाबिल खान भावूक झाला होता. तो म्हणाला,"दररोज मला माझ्या वडिलांची अर्थात इरफान खान यांची आठवण येते. त्यांची आठवण आल्याशिवाय एकही दिवस जात नाही. मी मोठा होत असताना माझे जास्त मित्र नव्हते. त्यावेळी माझे वडील माझे खास मित्र होते. त्यांच्यासोबत घालवलेला वेळ कायम लक्षात राहिल".
बाबिलसह इरफान खान यांची पत्नी सुपाता सिकदर यांनीदेखील 'आयफा 2023'मध्ये हजेरी लावली होती. लेकाच्या आनंदात सहभागी होत सुपाता म्हणाल्या,"बाबिलला त्याच्या पहिल्या सिनेमासाठी पुरस्कार मिळाल्याचा इरफानला नक्कीच आनंद होईल. 'काला' या सिनेमासाठी त्याला पुरस्कार मिळाला आहे, याचा आनंद आहे".
बाबिल खानच्या 'काला'बद्दल जाणून घ्या... (Babil Khan Qala Movie)
बाबिल खानने (Babil Khan) 'काला' (Qula) या सिनेमाच्या माध्यमातून अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं आहे. या सिनेमात तो तृप्ती जिमरीसोबत स्क्रीन शेअर करताना दिसला होता. हा सिनेमा प्रेक्षक नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर पाहू शकतात. या सिनेमात बाबिल जगनच्या भूमिकेत आहे. भूमिका छोटी असली तरीही तो आपल्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर राज्य करण्यात यशस्वी झाला आहे. अन्विका दत्तने या सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे. या सिनेमात बाबिल आणि तृप्तीसह स्वस्तिका मुखर्जी, अमित सियाल आणि समीर कोचर हे कलाकारदेखील महत्त्वाच्या भूमिकेत आहेत.
संबंधित बातम्या