मुंबई : बॉलिवूड ड्रग्ज प्रकरणात काही दिवसांपूर्वी इंडस्ट्रीमधील बड्या अभिनेत्रींची नावं समोर आली होती. त्यावेळी या अभिनेत्री अडचणीत सापडणार का? आणि तसेच रियाप्रणाणे यांनाही ड्रग्ज प्रकरणी अटक होणार का? असे प्रश्न उपस्थित करण्यात येत होते. अशातच एनसीबीने या अभिनेत्रींना चौकशीसाठी समन्स पाठवलं आणि ठरलेल्या दिवशी या अभिनेत्रींची चौकशीही पार पडली.


वकीलांच्या सहाय्याने दीपिका पादुकोण, सारा अली खान, श्रद्धा कपूर आणि रकुल प्रीत सिंह यांनी मात्र एनसीबी समोर जाण्याची तयारी केली होती. गोव्यामध्ये बसून एनसीबीच्या प्रश्नांची काय उत्तर द्यायची याची व्ह्यू रचना तयार करण्यात आली आणि त्याच प्रमाणे उत्तरे देण्यात आली. ड्रग्स प्रकरणात समोर आल्यानंतर दीपिका पदुकोण, सारा अली खान, श्रद्धा कपूर, रकुल प्रीत सिंह या एनसीबीला काय उत्तर देतील, यावर साऱ्यांचे लक्ष लागून होतं. मात्र त्यांनी एनसीबी अधिकाऱ्यांच्या तापसाला वळण देणारी उत्तर या अभिनेत्रींनी दिली. ही सगळी तयारी झाली ॲानलाइन...


सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणात ड्रग्ज चॅट हाती आल्यानंतर एनसीबी तपास सुरु केला. तपासा दरम्यान बॉलिवूडमधील मोठी नावे समोर येण्यास सुरुवात झाली. या नावांमध्ये दीपिका पदुकोण, सारा अली खान, श्रद्धा कपूर, रकुल प्रीत सिंग यांसारख्या बॉलिवूडमधील बड्या अभिनेत्रींची नावं होती. या अभिनेत्रींचं व्हॉट्सअॅप चॅट नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोच्या हाती लागलं होतं. ज्यामधून स्पष्ट होतं की, या अभिनेत्री ड्रग्स संदर्भात बोलत आहेत. त्यामुळे आरोप मान्य करण्या व्यतिरिक्त या अभिनेत्रींकडे कुठलाही पर्याय नव्हता. मात्र एनसीबीला दिलेल्या उत्तरांनी या अभिनेत्रींनी स्वतःला तर वाचवलंच पण एमसीबीच्या तपासाला सुद्धा वेगळं वळण दिलं.


पाहा व्हिडीओ : ड्रग्ज प्रकरणातील SRA म्हणजे शाहरुख, रणबीर, अर्जुन रामपाल!, दैनिक भास्करचा दावा, NCB कडून खंडन



नेमकं काय म्हणाल्या या अभिनेत्री आणि कशी झाली प्लॅनिंग...


दीपिका आणि तिची मॅनेजर करिष्मा यांचं ड्रग्ज संदर्भातील चॅट समोर आलं होतं. ज्याच्यामध्ये वीड आणि हॅश ड्रग्सच्या नावांचा उल्लेख करण्यात आला होता.


दीपिकाने हे चॅट तिचे असल्याचं मान्य केलं, मात्र या चॅटमध्ये ड्रग्जबद्दल बोल जात नसून सिगारेट बद्दल बोललं जात असल्याच तिने एनसीबीला जबाब दिला.


एनसीबीने जेव्हा याबद्दल दीपिका आणि करिश्माला विचारलं तेव्हा दीपिका ने उत्तर दिलं की, आम्ही मोठ्या सिगारेटला वीड म्हणतो तर छोट्या सिगारेटला हॅश म्हणतो.


दीपिकाची मॅनेजर करिश्मानेसुद्धा हेच उत्तर दिलं. तर स्वतः कधी ड्रग्स घेतले नाही मात्र सुशांत घ्यायचा असा जबाब एनसीबीला देऊन एका प्रकारे सुशांतवरच सर्व थोपवलं.


श्रद्धा कपूरने सीबीडी ऑइल घेतल्याच मान्य केलं, पण ते औषधी कारणाने घेत असल्याचं श्रद्धाने सांगितलं. तर रकुल ने तिच्यावर लावलेले सर्व आरोप फेटाळले.


अशा प्रकारे या सर्व अभिनेत्रींनी आपल्यावर लागलेल्या आरोपांपासून स्वतःला बगल देत सुशांत सिंह राजपूतला ड्रग्ज ॲडिक्ट ठरवलं. हे सर्व काही गोव्यामध्ये शिजंल. दीपिका पदुकोण आणि तिची मॅनेजर करिष्मा प्रकाश तसेच सारा अली खान या गोव्यामध्ये वकीलांच्या टीम सोबत आपली उत्तरे तयार करत होत्या. तर येथून रकुल प्रीत सिंग आणि श्रद्धा कपूर ऑनलाईन वकीलांच्या टीमसोबत कौन्सिलिंग करत होत्या.


तपासानंतर एनसीबी सूत्रांनी माहीती दिली की, 'तिनही अभिनेत्री पूर्ण तयारी करुन एनसीबीसमोर आल्या होत्या. दीपिका आणि करिष्मा या दोघींची उत्तरं एक सारखी होती. करिष्मानं पहिल्या दिवशी आजारी असल्याचं कारण देऊन तपासासाठी गैरहजर हजर राहिली होती. आम्हाला संशय आहे की, त्यावेळेस करिष्मा आणि दीपिका वकिलांसोबत गोव्यामध्ये होत्या आणि चौकशीची एकत्र तयारी करत होत्या.'


या अभिनेत्रींकडून हे चॅट ड्रग्ज संदर्भातील आहेत असं म्हणून जर मान्य केलं असतं, तर नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोचं काम कुठेतरी सोपं झालं असतं. मात्र यांच्याकडून देण्यात आलेल्या या उत्तरावर आता एनसीबी नेमकं काय करते? ते पाहणे महत्त्वाचं असणार आहे. कारण सारा अली खान, आणि श्रद्धा कपूर यांनी स्वतः कधी ड्रग्स घेत नसल्याचे सांगून सुशांत ड्रग घ्यायचा, असे उत्तर दिले आहे. मात्र सुशांत आता हयात नाही तर या गोष्टींची शहानिशा कशी करायची? हा मोठा सवाल एनसीबी समोर असणार आहे.


महत्त्वाच्या बातम्या :


सुशांत सिंह आता हयात नाही, मग तो ड्रग्ज कुणाकडनं घेत होता, हे कसं सिद्ध करणार?, हायकोर्टाचा सवाल


दीपिका पादुकोणसोबत काम केलेल्या तीन सुपरस्टार्सची NCB चौकशी करणार?


बॉलिवूडचा किंग खान शाहरुख अन् करण जोहर NCB च्या रडारवर?