मुंबई : ड्रग्स प्रकरणात बॉलिवूडमधील आणखी बडे सेलिब्रिटी एनसीबीच्या चौकशीच्या फेऱ्यात येण्याची शक्यता आहे. दीपिका पादुकोणसोबत काम केलेल्या तीन सुपरस्टार्सची चौकशी एनसीबीकडून होण्याची शक्यता आहे. या तीन अभिनेत्यांची नावे S, R आणि A पासून सुरु होत आहेत. या तीन सुपरस्टार्सची नावे प्रोड्युसर क्षितीज रवी प्रसादने घेतले असल्याची माहिती समोर येत आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार, A अक्षराने सुरु झालेल्या नावाचा अभिनेता ड्रग्ज घेत असे आणि संपर्कात असलेल्या लोकांनाही ड्रग्स देत असे. A नावाचा एक सुपरस्टार क्रिकेटरशीही संबंधित आहे. सूत्रांच्या माहितीनुसार लवकरच तिन्ही कलाकारांना समन्स पाठवण्यात येणार आहे.
Drug Case | निर्माता करण जोहरचीही एनसीबीकडून चौकशी? वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बैठकीनंतर निर्णय
26 सप्टेंबरला ड्रग्जच्या प्रकरणात एनसीबीने अभिनेत्री दीपिका पादुकोण, श्रद्धा कपूर आणि सारा अली खानचा जबाब नोंदवून घेतला आहे. त्याच दिवशी एनसीबीने धर्मा प्रोडक्शन्सचे कार्यकारी निर्माता क्षितिज रवी प्रसादला चौकशीनंतर अटक केली. या प्रकरणात एनसीबीने आतापर्यंत जवळपास 18 लोकांना अटक केली आहे.
बॉलिवूडचा किंग खान शाहरुख अन् करण जोहर NCB च्या रडारवर?
केंद्रीय संस्था एनसीबीने अभिनेत्री रिया चक्रवर्ती यांना 9 सप्टेंबर रोजी अटक केली. आज रियाच्या जामीन याचिकेवर मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी झाली. कोर्टाने या प्रकरणात निकाल राखून ठेवला आहे. एखादी व्यक्ती ड्रग्ज घेत असल्यास त्याची माहिती दडवण हेदेखील त्याला मदत करून उद्युक्त केल्यासारखंच आहे, असा दावा एनसीबीच्यावतीनं रिया चक्रवर्ताच्या जामीनाला विरोध करताना करण्यात आला.
महत्त्वाच्या बातम्या :