मुंबई: हिंदी चित्रपटसृष्टीत कथांचा तुटवडा असल्याचं मत अनेकजण मांडतात. पण याला खोटं ठरवलंय ते म्हणजे 'बधाई दो' या चित्रपटाने. सामाजिक आणि कौटुंबिक जडणघडणीत निषिद्ध अशा समलैंगिक लग्न या विषयावर हा चित्रपट बनवला आहे.


'बधाई दो' ही कथा शार्दुल ठाकुर (राजकुमार राव- Rajkumar Rao) आणि सुमन सिंग (भूमी पेडणेकर- Bhumi Pednekar) यांची आहे. पोलीस असलेला शार्दुल समलैंगिक समुदायाचा भाग आहे आणि पीटी शिक्षक असलेली सुमन उर्फ ​​सुमी लेस्बियन आहे. वेगळा समुदाय म्हटलं की त्या समुदायाचा स्ट्रगल हा एक वेगळ्याच प्रकारचा असतो. असाच स्ट्रगल शार्दुल आणि सुमीच्या आयुष्यात आहे आणि तोच या या सिनेमाच्या माध्यमातून दाखवण्यात आला आहे.


असं म्हणतात की लग्नाच्या जोड्या या स्वर्गात तयार होतात. पण त्या जोडप्यांचं काय ज्यांना एकमेकांसोबत तडजोड करुन राहावं लागतं? आपली सतत्या लपवून जगावं लागतं? असाच एक विवाह म्हणजे लव्हेंडर मॅरेज. हा विवाह दोन समलैंगिक व्यक्तींमध्ये होतो. लोक हा विवाह वेगवेगळ्या कारणांसाठी करतात. सर्वात म्हत्वाचं म्हणजे 'लोग क्या कहेंगे' हे कारण त्यामागे असतं. राजकुमार राव आणि भूमी पेडणेकर यांचा हा नवा चित्रपट 'बधाई दो' याच लव्हेंडर मॅरेजवर आधारित आहे.  शार्दुल आणि सुमी हे दोघेही आपलं वास्तव लपवून त्यात मुक्तपणे जगण्याचा प्रयत्न आणि संघर्ष करत आहेत.


राजकुमार रावने पोलीस शार्दुल ठाकूरची भूमिका उत्तम प्रकारे साकारली आहे. राजकुमारने आपल्या व्यक्तिरेखेत अशाप्रकारे गुंतून ठेवले आहे की, तुम्हाला शार्दुल ही एक भूमिका आहे असं वाटणार नाही. दुसरीकडे, सुमीच्या भूमिकेत भूमी पेडणेकर भावूक, संवेदनशील आणि धाडसी आहे. ती लेस्बियन आहे हे तिच्या घरच्यांना सांगायला सुमी कदाचित कचरत असेल पण ती एक धाडसी मुलगी आहे.
 
शीबा चड्ढा यांनी मोजक्याच शब्दांत पण नेहमीसारखं उत्तम काम केलं आहे. सीमा पाहवा,  लवलीन मिश्रा, नितेश पांडे, गुलशन देवैया आणि Chum Darang यांनी आपली भूमिका चोख पार पाडली आहे. चित्रपटाचं संगीत आणि ध्वनी रचना खूपच चांगली आहे.  'डायरेक्टर हर्षवर्धन कुलकर्णी ने 'बधाई दो'मध्ये LGBTQ ही गोष्ट सामान्य करण्याचा प्रयत्न करण्याचा प्रयत्न केला आहे.


'बधाई दो'चा पूर्वार्ध थोडा मजेत आहे, आपण आनंद घेत पाहू शकतो. पण उत्तरार्ध तुमचं मन प्रसन्न करेल आणि थोडं भावूकही करेल. हा चित्रपट तुम्हाला LGBTQ या समुदायावर बोलण्यासाठी प्रोत्साहित करेल.


LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha