Sonakshi Sinha and Zaheer Iqbal Wedding : अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा (Sonakshi Sinha) आणि जहीर इक्बाल (Zaheer Iqbal) विवाहबंधनात (Marriage) अडकणार आहेत. सोनाक्षी सिन्हा आणि झहीर इक्बाल यांच्या लग्नाच्या बातम्या गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत आहेत. सोनाक्षीने तिच्या हातावर झहीरच्या नावाची मेहंदी लावली असून अवघ्या काही तासांमध्ये दोघे सात जन्माचे जोडीदार बनतील. सोनाक्षीचं मुंबईतील घरही नवरीप्रमाणे सजवण्यात आलं आहे.
सोनाक्षी सिन्हा आणि जहीर इक्बालची लगीनघाई
सोनाक्षी सिन्हा आणि झहीर इक्बाल यांनी बराच काळ एकमेकांना डेट केल्यानंतर आता लग्न करण्याचा निर्णय घेतला आहे. या जोडप्याला वधू-वर होताना पाहण्यासाठी त्यांचे चाहते उत्सुक आहेत. दरम्यान, लग्नानंतर सोनाक्षी धर्म बदलणार का असा, प्रश्न अनेकांना पडला आहे. याबाबतीत मोठी माहिती आता समोर आली आहे.
लग्नानंतर सोनाक्षी सिन्हा धर्म बदलणार?
सोनाक्षी सिन्हा आणि झहीर इक्बाल यांच्या लग्नाची बातमी जेव्हापासून समोर आली आहे, तेव्हापासून यावर सोशल मीडियावर बरीच चर्चा रंगली आहे. सोनाक्षी हिंदू आहे आणि जहीर मुस्लिम आहे. या दोघांच्या वेगवेगळ्या धर्मामुळे अनेकांनी या दोघांना धारेवर धरलं आहे. सुत्रांच्या माहितीनुसार, सोनाक्षी सिन्हा आणि जहीर इक्बाल यांच्या लग्नात निकाह पढला जाणार नाही किंवा सात फेरेही होणार नाहीत. सोनाक्षी सिन्हा आणि जहीर इक्बाल यांचं लग्न विशेष विवाह कायद्यानुसार होणार असून यामध्ये कोणत्याही धर्माचे विधी पाळले जात नाहीत.
सोनाक्षी सिन्हा तिचा धर्म सोडणार नाही
सोनाक्षी आणि जहीरच्या लग्नाकडे बी-टाऊनसह चाहत्यांच्या नजराही लागल्या आहेत. सुत्रांच्या माहितीनुसार, सोनाक्षी सिन्हा लग्नानंतर धर्म बदलणार की नाही या संदर्भात अपडेट समोर आली आहे. सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सोनाक्षी सिन्हा लग्नासाठी किंवा लग्नानंतरही धर्म बदलणार नाही, असे सूत्राने सांगितले. मुस्लिम झहीरशी लग्न करूनही अभिनेत्री हिंदूच राहणार आहे. लग्नानंतरही ती नावही बदलणार नाही.
23 जूनला रिसेप्शन
दरम्यान, सोनाक्षीचे वडील अभिनेते आणि राजकारणी शत्रुघ्न सिन्हा यांनी अलीकडेच दुजोरा दिला आहे की, सोनाक्षी सिन्हा आणि झहीर इक्बाल यांच्या लग्नाबाबत त्यांच्या कुटुंबात काही तणाव होता. मात्र, आता सर्व तणाव दूर झाला आहे. त्यांनी सांगितलं की, 'आम्ही सर्वजण 23 जूनच्या संध्याकाळी लग्नाच्या रिसेप्शनला उपस्थित राहू.'
महत्त्वाच्या इतर बातम्या :