Preity Zinta Birthday: बॉलिवूडची 'डिंपल गर्ल' अशी ओळख असणाऱ्या प्रीती झिंटाचा (Preity Zinta) आज 48 वा वाढदिवस. प्रीतीनं गेल्या काही वर्षांपूर्वी चित्रपटसृष्टीमधून ब्रेक घेतला. तिनं अनेक हिट चित्रपटांमध्ये काम केलं तसेच ती किंग्ज इलेव्हन पंजाब या क्रिकेट टीमची मालकीण देखील आहे. प्रीतीचा जन्म 31 जानेवारी 1975 मध्ये हिमाचल प्रदेश येथे झाला. प्रीती ही 13 वर्षाची असताना तिच्या आई-वडिलांचा अपघात झाला. या अपघातात तिच्या वडिलांचा मृत्यू झाला. प्रीतीनं शिमला येथे शिक्षण घेतलं. प्रीतीच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल जाणून घेण्यासाठी तिचे चाहते उत्सुक असतात. तिच्या वाढदिवसानिमित्त जाणून घेऊयात तिच्या हिट चित्रपटांबद्दल तसेच तिच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल...
हिट चित्रपटांमध्ये केलं काम
प्रीतीनं अनेक हिट चित्रपटांमध्ये काम केलं आहे. 1998 मध्ये रिलीज झालेल्या दिल से या चित्रपटामधून प्रीतीनं अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं. तसेच तिनं सोल्जर चित्रपटामध्ये प्रमुख भूमिका साकारली. कल हो ना हो, कभी अलविदा ना कहना, कोई मिल गया, सलाम नमस्ते, वीर जारा या चित्रपटांमधील प्रीतीच्या अभिनयाला प्रेक्षकांची पसंती मिळाली.
प्रीतीच्या अफेर्सची चर्चा
प्रीतीचं नाव अनेकवेळा बिझनेसमॅन तसेच क्रिकेटर्ससोबत जोडलं गेलं. प्रीतीनं कभी अलविदा न कहना आणि झूम बराबर झूम या चित्रपटांमध्ये अभिषेक बच्चनसोबत काम केलं. त्यानंतर दोघे एकमेकांना डेट करत आहेत, अशी चर्चा सुरु झाली. तसेच प्रीतीचं नाव क्रिकेटर ब्रेट ली, अभिनेता-मॉडल मार्क रॉबिन्सन आणि बिझनेसमॅन नेस वाडिया यांच्यासोबत देखील जोडण्यात आलं. प्रीतीनं 2016 मध्ये प्रितीने जीन गुडइनफसोबत लग्नगाठ बांधली.
वयाच्या 46 व्या वर्षी झाली आई
प्रीती ही सरोगसीच्या माध्यमातून वयाच्या 46 व्या वर्षी आई झाली. 2021 मध्ये तिनं जुळ्यांना जन्म दिला. प्रीतीने सोशल मीडियावर पती जीन गुडइनफसोबतचा फोटो शेअर करुन ही गुडन्यूज चाहत्यांना दिली होती. जय झिंटा गुडइनफ आणि जिया झिंटा गुडइनफ अशी तिच्या जुळ्या मुलांची नावं आहेत. प्रीती ही तिच्या मुलांसोबतचे फोटो सोशल मीडियावर शेअर करते.
महत्वाच्या इतर बातम्या: