Alka Yagnik: हिंदी चित्रपटसृष्टीतील (Bollywood) प्रसिद्ध गायिका अलका याज्ञिक (Alka Yagnik) या त्यांच्या आवाजानं नेहमीच प्रेक्षकांची मनं जिंकतात. अलका यांनी अनेक हिट गाणी गायली आहेत. अलका यांची गाणी फक्त भारतातीलच नाही तर जगभरातील प्रेक्षक आवडीनं ऐकतात. गायिका अलका याज्ञिक यांनी सलग तिसऱ्या वर्षी यूट्यूबच्या (You Tube) स्ट्रिम लिस्टमध्ये पहिला क्रमांक मिळवला आहे. यामुळे त्यांची नोंद गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रिकॉर्ड्समध्ये करण्यात आली आहे.  टेलर स्विफ्ट, ड्रेक आणि बेयॉन्से यांसारख्या जगातील सर्वात प्रसिद्ध गायकांना मागे टाकत अलका यांनी यूट्यूबवरील स्ट्रिम चार्टमध्ये प्रथम क्रमांक पटकावला आहे. 2022 मध्ये नेटकऱ्यांनी अलका यांची गाणी सर्वाधिक ऐकली आहेत. 


अलाका यांची गाणी 15.3 बिलियन वेळा स्ट्रीम करण्यात आली आहेत. म्हणजेच, त्यांची गाणी रोज सरासरी 42 मिलियन वेळा त्यांची गाणी स्ट्रीम करण्यात येतात. गेली दोन वर्ष त्यांचे नाव या रेकॉर्डमध्ये आहे. 


या तीन भारतीय गायकांचे आहे यादीत नाव


अलका यांच्या नंतर यूट्यूबच्या टॉप स्ट्रिम यादीत बॅड बन्नीच्या नावाचा समावेश आहेत. त्याला 14.7 बिलियन स्ट्रीम्स मिळाले. तर लिस्टमध्ये उदित नारायण (10.8 बिलियन), अरिजीत सिंह (10.7 बिलियन) आणि कुमार सानू (9.09 बिलियन) यांच्या देखील नावाचा समावेश आहे. 



अलका याज्ञिक यांची सुपरहिट गाणी


अलका याज्ञिक या 90 च्या दशकातील प्रसिद्ध गायिका आहेत. त्यांनी अनेक सुपरहिट गाणी गायली आहेत. त्यांनी माधुरी दीक्षित, जुही चावला, श्रीदेवी यांसारख्या प्रसिद्ध अभिनेत्रींसाठी गाणी गायली आहेत. अगर तुम चाहो,परदेसी परदेसी, गजब का है दिन, ताल से ताल मिला, चुरा के दिल मेरा, गजब का है दिन, सूरज हुआ मद्धम, अगर तुम साथ हो आणि एक दिन आप यूं हम को मिल जाएंगे... या अलका यांच्या गाण्यांना प्रेक्षकांची पसंती मिळाली. अलका या सोशल मीडियावर देखील अॅक्टिव असतात. त्या सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांच्या नव्या गाण्यांची माहिती चाहत्यांना आणि नेटकऱ्यांना देतात. 


महत्वाच्या इतर बातम्या :


Happy Birthday Alka Yagnik : गायिका अलका याज्ञिक लग्न होऊनही पतीपासून 27 वर्षे दूर, 'हे' आहे कारण