Bollywood Actress Kissa: बॉलिवूडमधील (Bollywood) पुरुष सुपरस्टार्सचा काळ खूप जुना आहे. पण महिला सुपरस्टार्सचं युग सुरू करण्यात श्रीदेवी (Sridevi) यांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे. श्रीदेवी यांचा अभिनय आणि त्यांचं सौंदर्य इतकं अप्रतिम की, दक्षिण भारतीय चित्रपट प्रेक्षकही त्यांच्या प्रेमात पडले. तेव्हाच काय आज त्या आपल्यात नसल्या तरीदेखील, अनेकांच्या गळ्यातील ताईत आहेत, श्रीदेवी. अमिताभ बच्चन, जितेंद्र आणि मिथुन चक्रवर्ती सारख्या नायकांच्या युगात, श्रीदेवी या एकमेव महिला सुपरस्टार होत्या, ज्यांचे चित्रपट फक्त त्यांच्या नावानेच हिट व्हायचे. काही चित्रपट असे होते, जे त्या काळात फक्त त्यांना डोळ्यासमोर ठेवून बनवले गेले होते. त्याकाळा श्रीदेवी हे नाव अशा टप्प्यावर पोहोचलेलं की, चित्रपटाचे दिग्दर्शक आणि नावापेक्षाही त्या चित्रपटात श्रीदेवी आहे असं कळालं की, समजून ज्यायचं की, हा चित्रपट सुपरडुपर हिट होणार... पण त्याच काळात श्रीदेवी यांनी तब्बल हजार कोटींचा चित्रपट नाकारला होता. आणि तोच चित्रपट पुढे जाऊन सुपरडुपर हिट ठरला. 


श्रीदेवींनी नाकारलेला बिग बजेट चित्रपट 


मीडिया रिपोर्ट्सनुसार, स्टीफन स्पीलबर्ग यांनी श्रीदेवी यांना त्यांचा 'जुरासिक पार्क' चित्रपट ऑफर केला होता. पण श्रीदेवी यांनी या चित्रपटाचा भाग होण्यास नकार दिला होता. ही घटना 1993 साली घडली होती. श्रीदेवी त्यावेळी बॉलीवूडमधील लेडी सुपरस्टार म्हणून ओळखल्या जायच्या. तसेच, त्या खूपच विचारपूर्वक चित्रपट निवडायच्या. ज्यात त्यांची भूमिका खूप महत्त्वाची होती. जेव्हा श्रीदेवी यांनी या चित्रपटाबद्दल ऐकलं, तेव्हा त्यांना वाटलं की, चित्रपटातील त्यांची भूमिका तितकीशी मजबूत नाही. कारण त्यावेळी त्या चित्रपटाचा केंद्रबिंदू असायच्या. त्यामुळे श्रीदेवी यांनी हा चित्रपट करण्यास नकार दिला. मात्र, नंतर हा चित्रपट चांगलाच गाजला. सुपरडुपर हिट ठरला. पुढे या चित्रपटाचे काही पार्ट्सही आले. त्यापैकी एका पार्टमध्ये बॉलिवूड सुपरस्टार इरफान खानही दिसला होता. 


हजार कोटींचं बजेट असूनही श्रीदेवींनी चित्रपट नाकारला 


त्यावेळी बॉलीवूडमध्ये एवढ्या मोठ्या बजेटचे चित्रपट होत नव्हते. तेव्हा ज्युरासिक पार्कचे बजेट हजार कोटी रुपयांच्या आसपास होतं. त्यानंतरही श्रीदेवी ही भूमिका करायला तयार नव्हत्या. ज्युरासिक पार्क त्यावेळी एक मोठा हिट चित्रपट ठरला होता. त्यानंतर चित्रपटाचे आणखी काही भाग बनवण्यात आले. या चित्रपटात इरफान खान देखील होता. या वर्ल्ड वाईल्ड सीरिजमध्ये सामील होणारा इरफान खान पहिला बॉलिवूड स्टार बनला.


महत्त्वाच्या इतर बातम्या : 


Bollywood Actor Life Story : चार वर्षांत 50 चित्रपट, दोन हिट अन् 48 फ्लॉप, तरीही चाहते जीव ओवाळून टाकण्यास असतात तयार, ओळखलं का कोण?