Bollywood Actor Life Story : हिंदी चित्रपटसृष्टीतील सुप्रसिद्ध अभिनेते आणि 'डिस्को डान्सर' स्टार मिथुन चक्रवर्ती (Mithun Chakraborty) यांनी आपल्या करिअरमध्ये अनेक हिट चित्रपट दिले आहेत. मिथुन चक्रवर्ती यांना पहिला चित्रपट 'मृग्या' (1976) साठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा राष्ट्रीय पुरस्कारानं (National Awards) गौरवण्यात आलं. मिथुन चक्रवर्ती यांचे अनेक चित्रपट बॉक्स ऑफिसवर (Box Office) हिट ठरले. दरम्यान, त्यांच्या कारकिर्दीत एक वेळ अशीही आली, ज्यावेळी दिग्गज अभिनेता हिट चित्रपटांसाठी तरसला होता. चार वर्षात त्यांनी 50 चित्रपट केले, पण एकही चित्रपट हिट झाला नाही.
मिथुन दाचे 50 चित्रपट फ्लॉप...
कोईमोईच्या रिपोर्टनुसार, एकेकाळी 1980 च्या दशकातील सुपरस्टार मिथुन चक्रवर्ती यांचाच जलवा होता. 1982 मध्ये त्यांच्या 'डिस्को डान्सर'नं सगळ्यांनाच अक्षरशः वेड लावलं होतं. यानंतर, त्यांनी केलेले सर्व चित्रपट हिट ठरले, पण 1997 ते 2000 हा काळ त्यांच्या करिअरमधील सर्वात वाईट काळ होता, जेव्हा त्यांचे 50 पैकी फक्त 2 चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करू शकले. तर तब्बल 48 चित्रपट फ्लॉप ठरले, एवढ्या मोठ्या प्रमाणात चित्रपट फ्लॉप होण्याचा विक्रम मिथुन चक्रवर्ती यांच्याच नावावर आहे.
कोणत्या वर्षी किती चित्रपट?
मिथुन चक्रवर्तींचे 1997 मध्ये 8 चित्रपट प्रदर्शित झाले होते. त्यांनी 1998 मध्ये 17, 1999 मध्ये 14 आणि 2000 मध्ये 11 चित्रपटांमध्ये काम केलं. पण त्यापैकी त्यांचे फक्त दोनच चित्रपट हिट ठरले. यामध्ये 'शपथ' (1997) आणि 'चांडाल' (1999) यांचा समावेश आहे. या 50 चित्रपटांचे कलेक्शन 71.12 कोटी रुपये होतं. 'शपथ' हा त्यांचा सर्वात यशस्वी चित्रपट होता. ज्याची कमाई 4.95 कोटी रुपये होती. याशिवाय लोहा (2.3 कोटी), कालिया (2.74 कोटी) आणि दादागिरी (2.66 कोटी) हे त्यांचे सर्वाधिक कमाई करणारे चित्रपट होते.
हिट न होताही चित्रपटांची कोट्यवधींची कमाई...
1998 मधला त्याचा सर्वात यशस्वी चित्रपट 'चांदल' होता, ज्याने 3.59 कोटींची कमाई केली होती. याशिवाय शेर-ए-हिंदुस्तान (3.18 कोटी), गुंडा (2.14 कोटी), मिलिटरी राज (2.56 कोटी) आणि यमराज (2.84 कोटी) राहिले. 1999 मध्ये शेराचे कलेक्शन 2.62 कोटी होतं. तर गंगा की कसम आणि आग ही आग सारखे चित्रपट कधी आले आणि गेले ते कळलंच नाही. 2000 साली ज्वालामुखी, बिल्ला नंबर 786, आज का रावण आणि दादा हे चित्रपटही लोकप्रिय झाले. त्या वर्षी केवळ सुलतानची कमाई 1.38 कोटी रुपये होती.
महत्त्वाच्या इतर बातम्या :