Pushpa: The Rise : तेलगू सूपरस्टार अल्लू अर्जून (Allu Arjun) आणि रश्मिका मंदाना( Rashmika Mandana) यांचा आगामी पुष्पा : द राईज चित्रपट सध्या जोरदार चर्चेत आहे. हा चित्रपट 17 डिसेंबरला प्रदर्शित होणार आहे. ट्रेलर आणि ट्रिझर प्रदर्शित झाल्यापासूनच चाहत्यांना या चित्रपटाची उत्सुकता लागली आहे. नुकतीच या चित्रपटाची प्री रिलीज पार्टी ( Pre-Release Party) पार पडली. यामध्ये अभिनेता अल्लू अर्जून आणि अभिनेत्री रश्मिका मंदानाची मुख्य उपस्थिती पाहायला मिळाली. 


यावेळी दक्षिण सिनेसृष्टीतील सौंदर्यवान अभिनेत्री रश्मिका मंदाना आणि स्टायलीश स्टार अल्लू अर्जून ब्लॅक आऊटफिटमध्ये पाहायला मिळाले. रश्मिका यावेळी काळ्या रंगाच्या स्ट्रिंग ब्लाऊजसह सॅटीन साडीमध्ये फारच सुंदर दिसत होती. तिने यावर हिरव्या रंगाचे ब्रेसलेट आणि कानातले घातले होते. कमीत कमी मेकअपमधील तिचा हा लूक सुंदर दिसत होता. तर त्याच्या स्टाईलसाठी ओळखला जाणारा अल्लू अर्जूनही यावेळी काळ्या रंगाच्या सूटमध्ये दिसला. सध्या या पार्टीतील फोटो सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनला आहे.




'पुष्पा: द राइज' या आगामी चित्रपटाची प्री-रिलीझ पार्टी चित्रपटातील सर्व कलाकार आणि क्रूसह एक स्टार-स्टड इव्हेंट होता. मात्र, चित्रपटाचे दिग्दर्शक सुकुमार या कार्यक्रमाला अनुपस्थित होते. सुकुमारचे माजी सहकारी, चित्रपट निर्माते बुची बाबू साना यांनी सुकुमारच्या अनुपस्थितीबद्दल माहिती दिली. बुची बाबू यांनी सांगितले केले की, ''सुकुमार सध्या चित्रपटाच्या चित्रीकरणात व्यस्त आहेत.''


इतर बातम्या :



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha