Kangana Ranaut On Agneepath Scheme : बॉलिवूडची पंगाक्वीन कंगना रनौत (Kangana Ranaut) पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. अग्निपथ योजनेबाबत देशभरात संताप व्यक्त होत आहे. एकीकडे देशाच्या विविध भागात आंदोलक आपला निषेध व्यक्त करत आहेत. पण कंगनाने मात्र या योजनेचे समर्थन केलं आहे. कंगनाने सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली आहे. 


कंगनाने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत लिहिले आहे, "इस्रायल सारख्या देशांनी तरुणांना सैन्य दलात भरती करणे बंधनकारक केलं आहे. त्यामुळे देशातील प्रत्येक नागरिक आयुष्यातील काही वेळ देशसेवेत घालवतो. तसेच सैन्य दलाचे काम त्यांना जवळून पाहता येते. अग्निपथ योजना ही खूप महत्त्वाची योजना आहे. ड्रग्ज आणि पबजी खेळणाऱ्या मंडळींना योग्य दृष्टी देण्यासाठी अग्निपथ योजना महत्त्वाची ठरणार आहे. 



'अग्निपथ योजना' काय आहे? 


अग्निपथ योजनेत सहभागी झालेले जवान चार वर्षांचा त्यांचा कार्यकाळ पूर्ण करतील. त्यापैकी 25 टक्के जवानांना पुढे सेवेत कायम ठेवण्यात येणार आहे. पर्मनंट कमिशनच्या माध्यमातून त्यांना सैन्यात सामावून घेतल जाईल. या योजनेत देशातील सर्व विभागातील तरुणांना सहभागी करुन घेण्यात येईल. या योजनेत दहावी नंतर आयटीआय पदवी असलेल्यांना संधी असेल. या योजनेत सहभागी होऊन चार वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करणाऱ्यांना बारावी पासचे सर्टिफिकेट दिले जाईल. सैन्याला ज्या ट्रेडची गरज असते अशा वेल्डर, सुतार, वाहन चालक अशा ट्रेडमधून आयटीआय केलेल्यांना प्राधान्य असणार आहे. देशभरातून 46 हजार अग्निवीर या योजनेत भरती केले जातील. इथून पुढे सैन्य भरती अग्निपथ योजनेतूनच होणार आहे. 


'अग्निपथ योजने'ला होतोय विरोध


'अग्निपथ योजने'ला सध्या देशभरातून विरोध होत आहे. डे देशाच्या विविध भागात आंदोलक आपला निषेध व्यक्त करत आहेत. भरती प्रक्रियेतील बदलांबाबतही विरोधक केंद्रावर जोरदार निशाणा साधत आहेत. पण अभिनेत्री कंगना रनौतने मात्र या योजनेचे समर्थन केलं आहे. 


संबंधित बातम्या


आम्ही तुमच्या पाठीशी आहोत, तुमच्या मागण्या शांततेत मांडा; अग्निपथ योजनेविरुद्ध निदर्शन करणाऱ्यांना सोनिया गांधी यांचे आवाहन


Agneepath Scheme वरुन मोदी सरकार पॅनिक मोडमध्ये? तीन दिवसांत तीन मोठ्या घोषणा करुन असंतोषाची आग विझवण्याचा प्रयत्न