Agnipath Scheme Protest:  अग्निपथ योजनेबाबत देशभरात संताप व्यक्त होत आहे. एकीकडे देशाच्या विविध भागात आंदोलक आपला निषेध व्यक्त करत आहेत. त्याचवेळी भरती प्रक्रियेतील बदलांबाबतही विरोधक केंद्रावर जोरदार निशाणा साधत आहेत. अशातच काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी रुग्णालयातूनच देशातील तरुणांना एक पत्र जारी केले आहे.


देशातील तरुणांना संबोधित करताना सोनिया गांधी म्हणाल्या की, ''मला वाईट वाटते की सरकारने तुमच्या आवाजाकडे दुर्लक्ष केले आणि एक नवीन योजना जाहीर केली, जी पूर्णपणे दिशाहीन आहे. मी तुम्हा सर्वांना आवाहन करतो की तुम्ही आंदोलन कराच, पण अहिंसक आणि शांततेच्या मार्गाने. भारतीय राष्ट्रीय काँग्रेस तुमच्या सोबत आहे.''


त्यांनी एक पत्र देखील शेअर केले आहे, ज्यामध्ये लिहिले होते की, ''तुम्ही भारतीय सैन्यात भरती होऊन देशसेवेचे महत्त्वपूर्ण कार्य करण्याची इच्छा बाळगता. लष्करात लाखो पदे असूनही गेल्या तीन वर्षांपासून भरती न झाल्याची वेदना मी समजू शकते. एअरफोर्समध्ये भरती परीक्षा दिल्यानंतर निकाल आणि नियुक्तीची वाट पाहणाऱ्या तरुणांबद्दल मला पूर्ण सहानुभूती आहे.''


त्यांनी आपल्या पत्रात लिहिलं आहे की, ''तुमच्या आवाजाकडे दुर्लक्ष करून सरकारने नवीन सैन्य भरती योजना जाहीर केली, जी पूर्णपणे दिशाहीन आहे, याचे मला वाईट वाटते. तुमच्यासह अनेक माजी सैनिक आणि संरक्षण तज्ज्ञांनीही यावर प्रश्न उपस्थित केले आहेत. भारतीय राष्ट्रीय काँग्रेस तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे. ही योजना रद्द व्हावी आणि तुमच्या हिताचे रक्षण करण्याचे आश्वासन देते. खर्‍या देशभक्ताप्रमाणे अहिंसा, संयम आणि शांततेचा मार्ग अवलंबून आम्ही तुमचा आवाज सरकारसमोर बुलंद करू. मी तुम्हाला विनंती करते की, तुम्ही तुमच्या न्याय मागण्यांसाठी शांततापूर्ण आणि अहिंसक मार्गाने आंदोलन करा. भारतीय राष्ट्रीय काँग्रेस तुमच्या सोबत आहे.''


इतर महत्वाच्या बातम्या: 


Agneepath Scheme वरुन मोदी सरकार पॅनिक मोडमध्ये? तीन दिवसांत तीन मोठ्या घोषणा करुन असंतोषाची आग विझवण्याचा प्रयत्न
Agneepath Scheme : अमेरिका, चीन आणि इतर देशात अग्निवीरांची निवड कशी होते?