Farah Naaz Facts: 80 ते 90 च्या दशकात एक काळ गाजवलेली अभिनेत्री फराह नाज (farah naaz) जवळपास 20 वर्षे चित्रपटसृष्टीत सक्रिय होती, परंतु असे असूनही, तिची ओळख एक अनामिक अभिनेत्री (bollywood actress) अशीच आहे.


अभिनेत्रीने दोन लग्न केले


फराह नाज ही अभिनेत्री तब्बूची (bollywood actress Tabbu) मोठी बहीण आहे. फराहने तिच्या करिअरमध्ये 'नसीब अपना-अपना', 'यतीम', 'इमानदार', 'घर-घर की कहानी', 'इसी का नाम जिंदगी' इत्यादी अनेक चित्रपटांमध्ये काम केले होते. प्रदीर्घ काळ इंडस्ट्रीत सक्रिय असूनही फराहला चित्रपटांमध्ये अपेक्षित यश मिळाले नाही. मीडिया रिपोर्ट्सनुसार, फराह नाजने दोन लग्न केले होते. अभिनेत्रीचे पहिले लग्न अभिनेते दारा सिंह यांचा मुलगा विंदू दारा सिंग यांच्याशी झाले होते. मात्र, हे लग्न फार काळ टिकले नाही.


2003 मध्ये अभिनेता सुमित सैगलसोबत लग्न


लग्नाच्या सहा वर्षानंतर दोघांनी घटस्फोट घेतला आणि एकमेकांपासून वेगळे झाले. पहिल्या लग्नापासून फराह आणि विंदू दारा सिंह यांना मुलगा फतेह रंधवाचा जन्म झाला. विंदूपासून घटस्फोट घेतल्यानंतर फराहने 2003 मध्ये अभिनेता सुमित सैगलसोबत लग्न केले. फराह नाजच्या इंडस्ट्रीतील मित्रांबद्दल बोलायचे झाले तर त्यात आदित्य पांचोलीचे नाव येते.


सूरज पांचोलीच्या ‘सॅटेलाइट शंकर’ या चित्रपटाच्या स्क्रीनिंगदरम्यान दिसली


काही वर्षांपूर्वी फराह आदित्यचा मुलगा सूरज पांचोलीच्या ‘सॅटेलाइट शंकर’ या चित्रपटाच्या स्क्रीनिंगदरम्यान दिसली होती. यादरम्यान स्क्रिनिंगला पोहोचलेल्या फराहला ओळखणे कठीण झाले होते. फराहबद्दल असंही म्हटलं जातं की, तिला लॉन्च करणाऱ्या यश चोप्रांची पत्नी पामेलासोबतही तिचं भांडण झालं आहे. फराहने यश चोप्रा यांच्या 'फांसले' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले.


हेही वाचा :