Bipasha Basu : बॉलिवूड अभिनेत्री बिपाशा बासूने (Bipasha Basu) 12 नोव्हेंबर 2022 रोजी एका गोड मुलीला जन्म दिला आहे. बिपाशा आणि करण सिंह ग्रोवरला (Karan Singh Grover) कन्यारत्न झाल्याने त्यांचे चाहते प्रचंड खूश झाले आहेत. अशातच आता बिपाशाला रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला आहे. 


बिपाशाचे रुग्णालयातून बाहेर पडतानाचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. या फोटोंमध्ये बिपाशाच्या लेकीची पहिली झलक पाहायला मिळत आहे. फोटोंमध्ये बिपाशा आणि करण दोघेही आनंदी दिसत आहेत. आई-वडील झाल्याचा आनंद दोघांच्याही चेहऱ्यावर स्पष्ट दिसत आहे. 






वयाच्या 43 व्या वर्षी दिला गोड मुलीला जन्म


बिपाशाने वयाच्या 43 व्या वर्षी एका गोड मुलीला जन्म दिला आहे. त्यामुळे बिपाशाचे चाहते आनंदी झाले आहेत. एका मुलाखतीत बिपाशा म्हणाली होती,"मला आणि करणला मुलगी हवी आहे". आता त्यांना कन्यारत्न झाल्याने त्यांची ही इच्छा पूर्ण झाली आहे. लेकीच्या स्वागतासाठी आता ग्रोवर कुटुंबिय सज्ज आहे. 


बिपाशाने सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांना आनंदाची बातमी दिली होती. तसेच बिपाशा आणि करणने त्यांच्या लेकीचे नाव 'देवी बसु सिंह ग्रोवर' असं ठेवलं आहे. बिपाशाने शेअर केलेल्या फोटोवर चाहत्यांसह अनेक सेलिब्रिटीदेखील कमेंट्स करत बिपाशा-करणला शुभेच्छा देत आहेत. 


बिपाशा आणि करणची लव्ह स्टोरी


बिपाशा आणि करणची पहिली भेट एका चित्रपटाच्या सेटवर झाली. हे दोघे एकमेकांना काही वर्ष डेट करत होते. त्यानंतर 2016 मध्ये दोघांनी लग्न केलं. आता लग्नानंतर सहा वर्षांनी करण आणि बिपाशा आई-बाबा झाले आहेत. धूम 2, फिर हेरा फेरी,नो एन्ट्री, मेरे यार की शादी है या चित्रपटांमध्ये बिपाशानं काम केलं आहे. तर करणनं  कुबूल है,  दिल मिल गए,  दिल दोस्ती डान्स या मालिकेमध्ये काम केलं आहे.