Yashoda Box Office Collection Day 4: दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री समंथा रुथ प्रभूचा (Samantha Ruth Prabhu) यशोदा (Yashoda) हा चित्रपट सध्या बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. या चित्रपटाचे कथानक सरोगसी घोटाळ्यावर आधारित आहे. हा चित्रपट रिलीज होऊन चार दिवस झाले आहेत. या चित्रपटानं ओपनिंग डेला दहा कोटींपेक्षा जास्त कमाई केली. जाणून घेऊयात या चित्रपटाचं आतापर्यंतचं कलेक्शन...
फक्त देशभरातीलच नाही तर परदेशातील सिनेमागृहात देखील यशोदा हा चित्रपट धुमाकूळ घालत आहे. या चित्रपटाच्या कथानकाला आणि चित्रपटातील कलाकारांच्या अभिनयाला प्रेक्षकांची पसंती मिळत आहे. अमेरिकेमध्ये या चित्रपटानं 445K डॉलर्सपेक्षा जास्त कमाई केली आहे. तर भारतामध्ये यशोदा चित्रपटानं सोमवारी (14 नोव्हेंबर) 1.35- 1.45 कोटींची कमाई केली आहे. आतापर्यंत या चित्रपटानं भारतामध्ये 12 कोटींपेक्षा जास्त कमाई केली आहे.
समंथाचा पहिला पॅन इंडिया चित्रपट
समंथाचा यशोदा हा पहिला पॅन इंडिया चित्रपट आहे. हा चित्रपट पाच भाषांमध्ये प्रदर्शित झाला. तमिळ, मल्याळम, कन्नड, तेलुगू आणि हिंदी या भाषांमध्ये हा चित्रपट रिलीज झाला.
काय आहे चित्रपटाचं कथानक?
चित्रपटात समंथानं एका सरोगेट मदरची भूमिका साकारली आहे जी वैद्यकीय क्षेत्रात मोठ्या प्रमाणात सुरु असलेला घोटाळा उघडकीस आणते. या चित्रपटात समंथासोबत वरलक्ष्मी सरथकुमार, उन्नी मुकुंदन, राव रमेश, मुरली शर्मा, संपत राज, शत्रु, मधुरिमा, दिव्या श्रीपदा या कलाकारांनी देखील प्रमुख भूमिका साकारली आहे.
समंथाचा आगामी चित्रपट
समंथाचा खुशी हा चित्रपट देखील लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या चित्रपटात समंथासोबतच अभिनेता विजय देवरकोंडा देखील प्रमुख भूमिका साकाराणार आहे. हा चित्रपट डिसेंबर महिन्यामध्ये रिलीज होणार आहे असं म्हटलं जात आहे. या चित्रपटाची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत.
वाचा इतर महत्वाच्या बातम्या: