Bollywood Actress : बॉलिवूडच्या (Bollywood) अनेक अभिनेत्रींनी मेहनतीच्या जोरावर स्वत:ला सिद्ध केलं आहे. यातील काही अभिनेत्री या स्टारकिड आहेत. तर काहींचा मोठा संघर्ष आहे. फोटोत दिसणारी लहान मुलगी आज बॉलिवूडच्या मोस्ट टॅलेंटेड अभिनेत्रींपैकी एक आहे. अभिनेत्रीने आपल्या करिअरमध्ये अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये काम केलं आहे. आपल्या अभिनयाच्या जोरावर तिने स्वत:ला सिद्ध केलं आहे. अभिनेत्रीला आपल्या चित्रपटातील कामांसाठी नॅशनल पुरस्कारासह अनेक पुरस्कार मिळाले आहेत. आज ही अभिनेत्री कोट्यवधींची मालकीण आहे. अभिनेत्रीचं बालपण गरीबीत गेलं आहे.
फोटोत दिसणारी चिमुकली मुलगी ही दुसरी तिसरी कोणी नसून आलिया भट्ट (Alia Bhatt) आहे. आलिया भट्ट आज बॉलिवूडच्या टॉप अभिनेत्रींमध्ये सामील झाली आहे. पण अभिनेत्रीचं बालपण खूपच हालाखीत गेले आहे. अभिनेत्रीची आई आणि दिग्गज अभिनेत्री सोनी राजदान यांनी स्वत: याबद्दल खुलासा केला आहे. द नॉड मॅगसाठी बोलताना सोनी यांनी आलियाच्या बालपणाबद्दल भाष्य केलं. सोनी राजदान म्हणाल्या की,त्यांचे पती, दिग्दर्शक महेश भट्ट नेहमी कामात व्यस्त असे".
सोनी म्हणाल्या,"त्यावेळी सिंगल पॅरेंट असल्यासारखं मला वाटलं. महेशचा मला कायमच पाठिंबा राहिला. पण त्यावेळी तो कामात व्यस्त असायचाय एका दिवशी तीन चित्रपटांचं शूटिंग करायचा. शाहीन तीन आठवड्यांची असताना महेश शूटिंगसाठी निघून गेले होते. त्यावेळी आम्ही एका छोट्या घरात राहायचो. आमच्याकडे जास्त पैसेही नव्हते. पैसा कमावण्यासाठी आम्ही संघर्ष करत होतो. मुलांचा प्रेमाने सांभाळ केला".
आलिया भट्टची संपत्ती किती? (Alia Bhatt Net Worth)
आलियाचं बालपण गरिबीत गेलं असलं तरी आज ती 550 कोटी रुपयांची मालकीन आहे. आपल्या 12 वर्षांच्या करिअरमध्ये आलियाने एका पेक्षा एक चित्रपटांमध्ये काम केलं आहे. बॉलिवूडच्या सर्वात महागड्या अभिनेत्रींमध्ये आलिया भट्ट एक आहे. अभिनेत्री आपल्या एका चित्रपटासाठी 15 ते 20 कोटी रुपये आकारतात. तर जाहिरातींसाठी 1 ते 2 कोटी रुपये चार्ज करते. जाहिरातींच्या माध्यमातूनही ती चांगलीच कमाई करते. आलियाची स्वत:ची निर्मितीसंस्था आहे.
संबंधित बातम्या