Bollywood Actors : बॉलिवूड (Bollywood) सेलिब्रिटी त्यांच्या सिनेमांमुळे चांगलेच चर्चेत असतात. एखादा सिनेमा निवडताना सेलिब्रिटी खूप विचार करतात. पण कधीकधी त्यांचा निर्णय चुकतो. शाहरुख खान, (Shah Rukh Khan) रणवीर सिंहसह (Ranveer Singh) अनेक सेलिब्रिटींनी स्वत: च्याच पायावर कुऱ्हाड मारुन घेतली आहे. ब्लॉकबस्टर आणि सुपरहिट ठरलेले सिनेमे कलाकारांनी रिजेक्ट केले होते.


रणवीर सिंह (Ranveer Singh)


'कबीर सिंह' सिनेमासाठी दिग्दर्शक संदीप रेड्डी वांगा यांनी शाहिद कपूरआधी रणवीर सिंहला विचारणा केली होती. पण पात्र आवडलं नसल्याचं सांगत रणवीरने या सिनेमासाठी नकार दिला. पण 'कबीर सिंह' हा सिनेमा चाहत्यांच्या पसंतीस उतरला. हा सिनेमा ब्लॉकबस्टर ठरला.


शाहरुख खान (Shah Rukh Khan)


शाहरुख खाननेदेखील ब्लॉकबस्टर सिनेमासाठी नकार दिला होता. '3 इडियट्स' या सिनेमातील रैंचोच्या भूमिकेसाठी शाहरुखला विचारणा झाली होती. पण शाहरुखला वाटलं की तो या भूमिकेला योग्य न्याय देऊ शकत नाही आणि त्याने या सिनेमाला नकार दिला. 


सलमान खान (Salman Khan)


'चक दे इंडिया' या 2007 मध्ये प्रदर्शित झालेल्या सिनेमासाठी सलमान खानला (Salman Khan) विचारणा झाली होती. पण या सिनेमातील क्लायमॅक्स पसंत न पडल्याने भाईजानने या सिनेमासाठी आपला नकार कळवला.


सैफ अली खान (Saif Ali Khan)


शाहरुखआधी 'दिल वाले दुल्हनिया ले जाएंगे' या सिनेमासाठी सैफ अली खानला विचारणा झाली होती. पण हातात इतर प्रोजेक्ट असल्याचं सांगत सैफ अली खानने आपला नकार कळवला. 


ऐश्वर्या राय (Aishwarya Rai)


आमिर खान आणि करिश्मा कपूर यांच्या 'राजा हिंदुस्तानी' या सिनेमासाठी ऐश्वर्या रायला विचारणा झाली. पण तिने नकार दिल्याने ही भूमिका करिश्माने केली.


करीना कपूर (Kareena Kapoor)


करीना कपूरने 'कल हो ना हो' या सिनेमासाठी आपला नकार कळवला आहे. करीनाने या सिनेमासाठी शाहरुखपेक्षा जास्त मानधन मागितलं होतं. त्यामुळे करीनाऐवजी एका दुसऱ्या अभिनेत्रीला घेण्याचा निर्णय करण जोहरने घेतला. 


रणवीर सिंह, शाहरुख खान, सलमान खान, सैफ अली खान, ऐश्वर्या राय हे बॉलिवूड मनोरंजनसृष्टीतील लोकप्रिय अभिनेते आहेत. त्यांचे अनेक सिनेमे सुपरहिट ठरले आहे. बॉक्स ऑफिसवर जादू दाखवण्यात या सिनेमांना यश आलं आहे. पण काही गोष्टींबाबत मात्र त्यांचा निर्णय चुकला आहे.


संबंधित बातम्या


Gururaj Jois Passed Away: 'लगान' फेम सिनेमॅटोग्राफर गुरुराज जोइस यांचे निधन; वयाच्या 53व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास