Bollywood Actors Debut Film Fees : अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) ते शाहरुख खानपर्यंत (Shah Rukh Khan) अनेक कलाकार आज सेलिब्रिटी असले तरी हा पल्ला गाठण्यासाठी त्यांना खूप स्ट्रगल करावा लागला आहे. अनेक अडचणींचा सामना करत ते आज यशस्वी झाले आहेत. यात बॉलिवूडच्या अनेक लोकप्रिय कलाकारांचा समावेश आहे.
अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) :
बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन हे आज वयाच्या 80 व्या वर्षानंतरही चांगलेच अॅक्टिव्ह आहे. सध्या ते 'प्रोजेक्ट के' (Project K) या सिनेमामुळे चर्चेत आहेत. 1969 मध्ये 'सात हिंदुस्तानी' या सिनेमाच्या माध्यमातून अमिताभ बच्चन यांनी मनोरंजनसृष्टीत पदार्पण केलं. या सिनेमासाठी त्यांना पाच हजार रुपये मानधन मिळालं होतं. पण आज ते एका सिनेमासाठी आठ ते दहा कोटी मानधन घेतात.
शाहरुख खान (Shah Rukh Khan) :
बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खानचा देशासह परदेशातही मोठा चाहतावर्ग आहे. सध्या 'जवान' या सिनेमामुळे तो चर्चेत आहे. 1992 साली 'दीवाना' या सिनेमाच्या माध्यमातून किंग खानने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. या सिनेमासाठी त्याला चार लाख रुपये मिळाले होते. पण आज अभिनेता एका सिनेमासाठी 100 कोटी रुपये मानधन घेतो.
आमिर खान (Aamir Khan) :
बॉलिवूडचा मिस्टर परफेक्टनिस्ट आमिर खानने 'कयामत से कयामत तक' या सिनेमाच्या माध्यमातून इंडस्ट्रीत पदार्पण केलं होतं. या सिनेमात तो जुही चावलासोबत झळकला होता. या सिनेमासाठी आमिरला फक्त 11 हजार रुपये मिळाले होते. पण आज अभिनेता एका सिनेमासाठी 50 हजार रुपये मानधन घेतो.
अक्षय कुमार (Akshay Kumar) :
बॉलिवूडचा मिस्टर खिलाडी म्हणजेच अक्षय कुमारने 1991 साली 'सौगंध' या सिनेमाच्या माध्यमातून मनोरंजनसृष्टीत पदार्पण केलं. या सिनेमासाठी त्याला 51 हजार रुपये मिळाले होते. पण आज खिलाडी कुमार एका सिनेमासाठी 100 कोटी रुपयांचं मानधन घेतो.
सलमान खान (Salman Khan) :
बॉलिवूडचा भाईजान सलमान खानने 1988 मध्ये 'बीवी हो तो ऐसी' या सिनेमाच्या माध्यमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. या सिनेमासाठी त्याला फक्त 11 हजार रुपये मिळाले होते. पण भाईजान आज 100 कोटी रुपयांचं मानधन घेतो.
कार्तिक आर्यन (Kartik Aaryan) :
'प्यार का पंचनामा' या सिनेमाच्या माध्यमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणाऱ्या कार्तिक आर्यनचं पहिलं मानधन 1.25 लाख रुपये आहे. 'भूल भुलैया 2'साठी अभिनेत्याने 15 कोटी रुपयांचं मानधन घेतलं होतं.
संबंधित बातम्या