मुंबई : अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणात बुधवारी पोलिसांनी बॉलिवूडचे प्रसिद्ध कास्टिंग डायरेक्टर मुकेश छाबरा यांचा जबाब नोंदवला. मुकेश छाबरा यांनी पोलिसांना सांगितले की, '27 मे रोजी वाढदिवसाच्या दिवशी सुशांतने त्याला शुभेच्छा संदेश केला होता. मेसेजमध्ये मुकेशने सुशांतची विचारपूस केली. त्यावर सुशांतने रिप्लाय केला
'मी ठीक नाही'. मुकेशने सुशांतला याचे कारण विचारले असता सुशांतने उत्तर दिले की 'मी ठीक आहे, मी ठीक होईन’ असं उत्तर दिलं'.
सुशांतने मुकेशबरोबर आपली अडचण, आपला त्रास शेअर करण्याचा प्रयत्न केला होता पण सुशांतने ते पूर्ण केले नाही.
मुकेशच्या म्हणण्यानुसार सुशांत हा एक अत्यंत हुशार, अभ्यासू आणि मेहनती अभिनेता होता. जवळजवळ प्रत्येक विषयाचे त्याला ज्ञान होते. मुकेशने पोलिसांना सांगितले की, त्याने सुशांतला ‘काय पो चे’ या चित्रपटात कास्ट केले होते. तेव्हापासून त्यांचे मैत्रीचे संबंध होते. त्यानंतर मुकेशने सुशांतला पीके या चित्रपटात देखील कास्ट केले. सुशांतने या चित्रपटासाठी मोठे पैसा मागितले नव्हते कारण हा एक मोठ्या बॅनरचा चित्रपट होत. सुशांतला नेहमीच एका मोठ्या बॅनरच्या चित्रपटात काम करण्याची इच्छा होती.
मुकेशच्या वक्तव्यावरून हे स्पष्ट झाले आहे की सुशांत नेहमीच मोठ्या बॅनरमध्ये जाण्यास उत्सुक होता. पण तसे होऊ शकले नाही.
पीकेनंतर सुशांतला चित्रपट मिळू लागले आणि एमएस धोनीनंतर तो एक मोठा स्टार झाला, अशी माहितीही मुकेशने पोलिसांना दिली. सुशांतने मुकेशला वचन दिले होते की, तो कितीही मोठा स्टार असला तरी तो मुकेशच्या दिग्दर्शनात होणाऱ्या पहिल्या सिनेमात काम करेल. सुशांतने आपले वचन पाळले. मुकेशच्या ‘दिल बेचारा’ या पहिल्या चित्रपटात सुशांतने मुख्य भूमिका साकारली होती. सुशांतने सप्टेंबर महिन्यात चित्रपटाचे डबिंग पूर्ण केले आणि त्यानंतर त्यांच्यात फारसा संपर्क झाला नाही.
मुकेश यांच्याशी सुशांतच्या व्यावसायिक तणावाबद्दल विचारले असता मुकेशने सांगितले की, जर सुशांतच्या 5-6 ते चित्रपट त्याच्याकडून काढून घेऊन त्याच्यावर बंदी घातल्यासारखे काही झालं असतं तर सुशांतने त्याला सांगितलं असतं. त्याचवेळी मुकेशने असेही सांगितले की, सुशांत त्याच्या ड्रीम 150 प्रोजेक्ट संदर्भात त्याच्या टीमसोबत काम करत होता.
मुकेश यांनी सुशांतच्या ‘एमएस धोनी’ हिट चित्रपटाबद्दलही पोलिसांना माहिती दिली. मुकेशच्या म्हणण्यानुसार, सुशांत हा बिहारचा होता, जे धोनीच्या राज्याचे शेजारचे राज्य आहे, दोन राज्यांची बोलीभाषा जवळ जवळ एक सारखी आहे. ‘काय पो चे' चित्रपटातही सुशांत क्रिकेट खेळला होता. या भूमिकेसाठी सुशांत परफेक्ट होता आणि त्याला कास्ट केलं गेलं. सुशांतने हा चित्रपट स्वत:च्या मेहनतीवर आणि टॅलेंटवर मिळवला होता, असं देखील मुकेश यांनी सांगितलं.
'सुशांतने मला सांगितले, तो ठीक नाही' : मुकेश छाबरा
गणेश ठाकूर, एबीपी माझा
Updated at:
18 Jun 2020 09:58 AM (IST)
सुशांत सिंह राजपूतने मुकेशबरोबर आपली अडचण, आपला त्रास शेअर करण्याचा प्रयत्न केला होता.
कास्टिंग डायरेक्टर मुकेश छाबरा यांचा मुंबई पोलिसांना दिलेल्या जबाबात समोर आली माहिती.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -