मुंबई : दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूत आणि त्याची एक्स गर्लफ्रेंड अंकिता लोखंडे या दोघांचाही कॉमन फ्रेंड असणाऱ्या संदीप सिंहने सुशांत यांच्यासोबतच्या आपल्या आठवणींना उजाळा दिला आहे. संदीप सिंहने सोशल मीडियावर एक भावुक पोस्ट लिहली आहे. दरम्यान, सुशांत सिंह राजपूतने 14 जून रोजी आपल्या राहत्या घरी आत्महत्या केली होती. अद्याप सुशांतच्या आत्महत्येचं कोडं उलगडलेलं नाही.
इन्स्टाग्रामवर आपल्या भावना व्यक्त करत संदीप सिंहने लिहिलं आहे की, 'सुशांत आणि एक्स गर्लफ्रेंड अंकिता लोखंडे एकमेकांसाठी बनले होते. दोघंही एकमेकांवर खरं प्रेम करत होते. तसेच एकमेकांसोबत लग्न करण्याचाही त्यांचा विचार होता.' पुढे संदीप सिंहने लिहिलं आहे की, 'अंकिताच ती व्यक्ती होती, जी सुशांतचा जीव वाचवू शकत होती. अंकितासाठी संदीप म्हणाला की, 'तू त्याची गर्लफ्रेंड होतीस, त्याची आई होतीस, पत्नी होतीस, तू आयुष्यभरासाठी त्याची बेस्ट फ्रेंड होतीस.'
आपल्या इन्स्टाग्राम पोस्टवर संदीप अंकिताला उद्देशून म्हणाला की, 'जेव्हा तुम्ही दोघं एकमेकांपासून वेगळे झाला होतात, तेव्हाही तू त्याच्या आनंदासाठी प्रार्थना करत होतीस. तुझं प्रेम शुद्ध होतं आणि अत्यंत खास होतं. तू आजही तुझ्या घराच्या नेमप्लेटवरून त्याचं नाव काढलेलं नाही.'
संदीप सिंहने पुढे लिहिलं आहे की, तो सुशांत आणि अंकितासोबत घालवलेल्या प्रत्येक क्षणाला खूप मिस करतोय आणि एकत्र खेळलेल्या होळीसोबत गोवा ट्रिप आणि मुंबईमधील लोखंडवालाच्या घरातील तिघांनी घालवलेलं सुंदर क्षण आठवतात. संदीपने भावुक होत पुढे लिहिलं की, 'प्रिय अंकिता, प्रत्येक दिवसासोबत मला सतत हेच विचार डोक्यात येतात की, जर आपण आणखी प्रयत्न केले असते, तर आपण त्याला थांबवू शकलो असतो...'
दरम्यान, अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येनंतर त्याचा मित्र महेश शेट्टी व्यतिरिक्त त्याचे कुटुंबीय, मित्र, जवळचे नातेवाईक आणि पोलीसांसोबत सतत संपर्कात राहणाऱ्या आणि सर्वांसोबत सतत कोऑर्डिनेट करणाऱ्या व्यक्तीचं नाव आहे संदीप सिंह. संदीप सिंह फिल्म प्रोड्यूसर होण्याआधी सुशांत आणि अंकिताचा जवळचा मित्र होता. सुशांतच्या मृत्यूनंतर संदीपच ती व्यक्ती होती, जी अंकिता लोखंडेसोबत सुशांतच्या घरी जाताना दिसली होती.
सुशांत, अंकिता आणि संदीप बऱ्याच दिवसांपासून एकमेकांचे मित्र होते. एक फिल्म प्रोड्यूसर म्हणून काम करण्यााधी संदीप संजय लीला भंसाली फिल्मसचा सीईओ म्हणून काम करत होता. संदीपने 'अलीगढ', 'सरबजीत', 'भूमी' आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी' यांसारखे चित्रपट प्रोड्यूस केले आहेत.
महत्त्वाच्या बातम्या :
'मला सुशांतने यशराज फिल्म्स सोडण्यास सांगितले होते', रिया चक्रवर्तीचा पोलिसांना जबाब
सुशांत सिंग राजपूत आत्महत्या प्रकरणात अभिनेत्री रिया चक्रवर्तीची पोलिसांकडून 11 तास चौकशी
फिल्म इंडस्ट्रीतील तणावामुळे सुशांत लो फील करत होता, वडिलांचा जबाब
सुशांत सिंग राजपूतच्या आत्महत्येबाबत पोलीस चौकशी सुरू, बॉलिवूडमधील दिग्गजांची चौकशी होण्याची शक्यता