'ढाई किलो का हाथ भाजप के साथ', अभिनेता सनी देओलचा भाजपमध्ये प्रवेश
एबीपी माझा वेब टीम | 23 Apr 2019 01:01 PM (IST)
संरक्षणमंत्री निर्मला सीतारमण आणि रेल्वेमंत्री पियुष गोयल यांच्या उपस्थितीत बॉलिवूड अभिनेता सनी देओलने भारतीय जनता पक्षात प्रवेश केला.
नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीचा फिव्हर सर्वत्र वाढू लागला आहे. मतदारांना आकर्षित करण्यासाठी सर्व राजकीय पक्ष बॉलिवूड सेलिब्रिटींना राजकीय आखाड्यात उतरवत आहेत. काही दिवसांपूर्वी बॉलिवूड अभिनेत्री उर्मिला मातोंडकर हिने काँग्रेसमध्ये प्रवेश केला. उर्मिला उत्तर मुंबई मतदार संघातून निवडणूक लढत आहेत. त्यात आता बॉलिवूड अभिनेता सनी देओलची भर पडली आहे. आज (मंगळवार, 23 एप्रिल) संरक्षणमंत्री निर्मला सीतारमण आणि रेल्वेमंत्री पियुष गोयल यांच्या उपस्थितीत सनी देओलने भाजपमध्ये प्रवेश केला. सनी देओल भारतीय जनता पक्षाच्या तिकीटावर पंजाबच्या गुरुदासपूर मतदार संघातून निवडणूक लढणार असल्याची सध्या चर्चा सुरु आहे. VIDEO | 'ढाई किलो का हाथ भाजपके साथ', अभिनेता सनी देओलचा भाजपमध्ये प्रवेश | एबीपी माझा भाजप प्रवेशाबाबत सनी देओल म्हणाला की, "माझे बाबा ज्या प्रकारे अटल बिहारी वाजपेयी यांच्यासोबत होते, त्याचप्रमाणे मी पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत आहे. आपल्या देशातील तरुणांच्या आणि देशाच्या विकासासाठी आपल्याला मोदींसारख्या नेतृत्वाची आवश्यकता आहे. भाजप या परिवारासोबत जोडल्यानंतर मी जे काही शक्य आहे, ते करणार आहे."