खोटं प्रतिज्ञापत्र सादर करण्याचा सलमानचा इरादा नव्हता, असा युक्तिवाद सलमानच्या वतीने वकिलांनी कोर्टात केला. मुंबईच्या पोलिस आयुक्तांकडे सलमानने आपला परवाना सादर केला होता. पोलिस उपायुक्तांनी यासंदर्भात कोर्टात जबानी दिली होती, याकडे सलमानच्या वकिलांनी लक्ष वेधलं.
'हम साथ साथ है' चित्रपटाच्या वेळी जोधपूरमध्ये काळवीटाची शिकार केल्याप्रकरणी 1998 साली सलमानविरोधात चार केसेस दाखल करण्यात आल्या होत्या. त्यापैकी तीन काळवीट हत्या प्रकरणात, तर एक शस्त्रास्त्र कायद्याअंतर्गत दाखल करण्यात आली होती.
सलमान खान अवैध शस्त्र खटल्यातूनही सुटला!
खटला कुणी दाखल केला?
सलमान खानसह सैफ अली खान, सोनाली बेंद्रे, तब्बू आणि नीलम यांच्याविरोधात बिष्णोई समाजातील लोकांनी पोलिसात गुन्हा दाखल केला. त्यावेळी सलमानवर तीन गुन्हे दाखल करण्यात आले होते. मात्र अटक करताना पोलिसांनी सलमानच्या रुममध्ये दोन रायफल मिळाल्या, ज्यांचा परवाना संपलेला होता. त्यानंतर त्याच्याविरोधात शस्त्रास्त्र कायद्यानुसार हा गुन्हा दाखल करण्यात आला.
काळवीट शिकार प्रकरणी सलमानला 5 एप्रिल 2018 रोजी दोषी ठरवण्यात आलं होतं. त्याला पाच वर्षांचा कारावास सुनावण्यात आला होता. सलमानने जोधपूर कारागृहात दोन रात्री घालवल्यानंतर त्याला जामीन मंजूर करण्यात आला होता. सलमानचे सहकलाकार सैफ अली खान, सोनाली बेंद्रे, तब्बू आणि नीलम यांची पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता करण्यात आली होती.