Happy Birthday Prabhas: 'बाहुबली' म्हणून ओळखला जाणारा अभिनेता प्रभासचा आज 42 वा वाढदिवस. प्रभासचा जन्म  1979 मध्ये मद्रास  (तमिळनाडु)  येथे झाला. प्रभासचे खरे नाव वेंकट सत्यनारायण प्रभास राजू उप्पालापाटि आहे. अनेकांना त्याचे हे नाव माहित नाही. प्रभास त्याच्या अभिनयाने प्रेक्षकांचे मनोरंजन करत असतो. प्रभासने त्याच्या अभिनय क्षेत्रातील करिअरची सुरूवात साउथ फिल्म इंडस्ट्रीमधून केली.  2002 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘ईश्वर’ या चित्रपटामधून प्रभासने अभिनय क्षेत्रात पदार्पण केले. सध्या तो बॉलिवूडमध्ये देखील काम करतो.   


बाहुबली चित्रपटाबद्दल काही खास गोष्टी


प्रभासच्या बाहुबली चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली. त्याच्या या चित्रपटातील अभिनयामुळे त्याला विशेष लोकप्रियता मिळाली. बाहुबली हा चित्रपट दोन भागांमध्ये प्रदर्शित झाला. या चित्रपटासाठी प्रभासने 30 किलो वजन वाढवले. प्रभास वजन वाढवण्यासाठी रोज 40 अंडी खात होता. तसेच 5 ते 6 तास तो जिम मध्ये व्यायाम करत होता.  बाहुबली चित्रपटाचे शूटिंग 5 वर्ष सुरू होते. या चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान प्रभासने दुसरा कोणत्याही चित्रपटमध्ये काम केले नाही. 


बाहुबली चित्रपटाच्या चित्रीकरणा दरम्यान त्याला एका चित्रपटासाठी 200 कोटीची ऑफर आली होती. पण त्याने ती नाकारली.  बाहुबली चित्रपटाचे 250 कोटी बजेट होते. प्रभासने या चित्रपटामध्ये बाहुबली ही भूमिका साकारण्यासाठी 24 कोटी मानधन घेतले. प्रभासने 1.5 कोटी रूपये जिमसाठी खर्च केले होते. 


Theaters Reopen : 'नमितो तुजला कलेश्वरा' ही नांदी रसिक प्रेक्षकांसमोर घेऊन आले आहेत दिग्गज


वाढदिवसानिमित्त प्रभासने दिलं चाहत्यांना गिफ्ट


 वाढदिवसाच्या निमित्ताने प्रभासच्या चाहत्यांसाठी खूश खबर आहे. प्रभासचा 'मिर्ची' सिनेमा तेलुगु राज्यातील सिनेमागृहांत पुन्हा एकदा पाहता येणार आहे. प्रभासचा 'मिर्ची' सिनेमा आठ वर्षांपूर्वी प्रदर्शित करण्यात आला होता. त्यावेळी या सिनेमाचे दिग्दर्शन कोराताली शिवा यांनी केले होते. या चित्रपटाने बॉक्सऑफिसवरचे अनेक रेकॉर्ड्स तोडले होते. आठवर्षांनंतरही प्रभासचा सिनेमा पाहण्यासाठी चाहत्यांमध्ये उत्सुकता दिसून येत आहे.


Prabhas Birthday Celebration : साउथचा स्टार Prabhas चा वाढदिवसानिमित्त चाहत्यांना सिनेमागृहात पुन्हा एकदा पाहता येणार 'मिर्ची' सिनेमा