Shiv Thakare : 'बिग बॉस' (Bigg Boss) फेम शिव ठाकरे (Shiv Thakare) सध्या चर्चेत आहे. 'बिग बॉस'च्या माध्यमातून छोटा पडदा गाजवल्यानंतर शिव ठाकरे (Shiv Thakare) आता मोठा पडदा गाजवण्यासाठी सज्ज आहे. शिव ठाकरे आता एका मराठी सिनेमात झळकणार असल्याची बातमी समोर आली आहे. 


'आपला माणूस' शिव ठाकरेचा मोठा चाहतावर्ग आहे. 'मराठी बिग बॉस'चा विजेता असलेल्या शिवला आजवर एकाही मराठी सिनेमासाठी विचारणा झाली नव्हती. हिंदी बॉसमध्ये सहभागी होण्याची शिवची इच्छा होती. 'बिग बॉस 16'च्या (Bigg Boss 16) माध्यमातून शिवची ही इच्छा पूर्ण झाली आहे. तसेच मराठी सिनेमात मुख्य भूमिकेत झळकण्याचं शिवचं स्वप्नदेखील पूर्ण झालं आहे.






शिवच्या आगामी मराठी सिनेमाची निर्मिती अमोल खैरनार करणार आहेत. हिंदी बिग बॉस गाजवल्यानंतर शिवला अनेक चांगल्या दर्जाच्या सिनेमांसाठी विचारणा होत आहे. मराठी सिनेमात झळकण्यासोबत रोहित शेट्टीच्या 'खतरों के खिलाडी' या कार्यक्रमातदेखील शिव ठाकरे सहभागी होणार आहे. आता शिवची खेळी पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत.


'खतरों के खिलाडी 13'मध्ये शिव ठाकरे होणार सहभागी!


शिव ठाकरेने अनेकदा 'खतरों के खिलाडी' या कार्यक्रमात सहभागी होण्याची इच्छा व्यक्त केली आहे. 'खतरों के खिलाडी 13'साठी स्पर्धकांची निवड करायला रोहित शेट्टी 'बिग बॉस'च्या घरात गेला होता. त्यावेळी तो टास्क शिव हरला होता. पण शिवची एकंदरीत खेळी पाहता रोहितने 'खतरों के खिलाडी 13'साठी शिवला विचारणा केली आहे. त्यामुळे 'खतरों के खिलाडी 13'मध्ये शिव ठाकरे सहभागी होणार आहे. शिव ठाकरे 'बिग बॉस' आधी एमटीव्हीच्या 'रोडीज' या कार्यक्रमामधून प्रेक्षकांच्या भेटीस आला. शिव हा बिग बॉस मराठीच्या दुसऱ्या सिझनचा विजेता आहे. या कार्यक्रमामुळे शिव घराघरांत पोहोचला आहे.


शिव ठाकरे 'आपला माणूस' कसा? 


शिव ठाकरे हे नाव आता घराघरांत लोकप्रिय आहे. 'रोडीज', 'बिग बॉस मराठी' आणि हिंदी बिग बॉस असे एकापेक्षा एक रिअॅलिटी शो शिव ठाकरेने केले आहेत. मग तरी तो 'आपला माणूस' कसा असा प्रश्न अनेकांना पडतो. यावर भाष्य करताना शिव ठाकरे म्हणाला, "मी लोकांना जोडणारा माणूस आहे. माझं स्वप्न मोठ्या पडद्यावर दिसण्याचं आहे. अजूनही सेलिब्रिटीवाला टॅग आलाय, असं मला वाटत नाही. माझ्या मागे मीडिया आणि चाहत्यांची होणारी धावपळ हाच माझ्या स्वप्नांचा प्रवास आहे. मेहनत घेत पुढे आलो आहे आणि आजही घेत आहे. त्यामुळे आजही मी 'आपला माणूस' आहे. 


संबंधित बातम्या


Shiv Thakare On Casting Couch: शिव ठाकरेला करावा लागला कास्टिंग काऊचचा सामना; म्हणाला, 'तो मला बाथरुममध्ये...'