Hrithik Roshan:  अभिनेता हृतिक रोशन (Hrithik Roshan) सध्या त्याच्या आगामी 'फायटर' चित्रपटामुळे चर्चेत आहे.  नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला आहे. या ट्रेलरचे सर्वजण कौतुक करत आहेत. एकीकडे हृतिकच्या चित्रपटाच्या ट्रेलरचे कौतुक होत असताना दुसरीकडे हृतिकने विक्रांत मॅसीच्या 12 वी फेल या चित्रपटाचे कौतुक केले आहे. हृतिकनं ट्विटरवर ट्वीट शेअर करुन 12 वी फेल या चित्रपटाचे कौतुक केले आहे.


हृतिकनं '12 वी फेल'चं केलं कौतुक


हृतिक रोशनने ट्वीटमध्ये लिहिलं, "मी 12 वी फेल हा चित्रपट पाहिला. फिल्म मेकिंगमधला  हा एक मास्टरक्लास आहे. इतर सर्व गोष्टींपेक्षा मला  साऊंड आणि चित्रपटातील सीन अधिक रंजक करण्यासाठी वापण्यात आलेले साऊंड इफेक्ट्स खूप आवडले. ब्रिलियन्ट परफॉर्मन्स. मिस्टर चोप्रा, काय चित्रपट आहे! मला यातून खूप प्रेरणा मिळाली आहे."






नेटकऱ्यांनी हृतिकला का केलं ट्रोल?


हृतिकने या चित्रपटाचे कौतुक केले आहे पण नेटकऱ्यांनी एका कारणामुळे त्याला सुनावले आहे. हृतिक त्याच्या ट्वीटमध्ये चित्रपटाचे दिग्दर्शक विधू विनोद चोप्रा यांचा उल्लेख केला आहे परंतु त्याने चित्रपटाच्या मुख्य अभिनेत्याचा म्हणजे विक्रांत मॅसीचा कुठेही उल्लेख केलेला नाही. हृतिकच्या या चुकीमुळे नेटकऱ्यांनी त्याला ट्रोल केलं.


एका यूजरने हृतिकच्या ट्वीटला कमेंट केली आहे की, :तुम्हाला फक्त विधू विनोद चोप्रा दिसले का? चित्रपटाची बाकीची स्टारकास्ट दिसली नाही"? दुसर्‍या युजरने लिहिले - 'जर तुम्ही विक्रांत भाईलाही क्रेडिट दिले असते तर आणखी मजा आली असती'. त्याचप्रमाणे अनेक नेटकरी ट्वीटमध्ये विक्रांतला क्रेडिट न दिल्याबद्दल हृतिक रोशनला टोमणे मारत आहेत.










 फायटर या चित्रपटात हृतिक हवाई दलाच्या पायलटच्या भूमिकेत दिसणार आहे. हृतिकच्या फायटर या चित्रपटात दीपिका पदुकोण,अनिल कपूर आणि करण सिंग ग्रोव्हर हे कलाकार देखील महत्वाची भूमिका साकारणार आहे. हा चित्रपट 25 जानेवारीला थिएटरमध्ये प्रदर्शित होत आहे.


वाचा इतर महत्वाच्या बातम्या:


Hrithik Roshan: अन् ऋतिक रोशनने पहिल्या बायकोला मिठी मारली; क्षण पाहताच लोक म्हणाले...