Sana Raees Khan : 'बिग बॉस 17'ची (Bigg Boss 17) धमाकेदार सुरुवात झाली आहे. कलाकार आणि युट्यूबरसह या घरात एन्ट्री झालेल्या एका स्पर्धकाचं कनेक्शन थेट आर्यन खान (Aryan Khan) प्रकरणाशी आहे. आर्यन खान ड्रग्ज प्रकरणातील वकील सना रईस खानची (Sana Raees Khan) 'बिग बॉस 17'मध्ये एन्ट्री झाली आहे. 


आर्यन खान ड्रग्ज प्रकरणातील वकील सना रईस खानची बिग बॉसच्या घरात एन्ट्री झाली आहे. सनाने एविन साहूलकी केस लढवली आहे. तसेच शिना बोराच्या केसमध्येही ती वकील होती. सनाची 'बिग बॉस'च्या घरात एन्ट्री झाल्याने हे पर्व आणखीनच मनोरंजक होऊ शकतं. 'बिग बॉस'च्या माध्यमातून आर्यन खान प्रकरणाशी संबंधित काही न ऐकलेल्या गोष्टी समोर येतील असे म्हटले जात आहे.


कोन आहे सना रईस खान? (Who is Sana Raees Khan)


सना रईस खान ही वकील आहे. मुंबईतील उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयात ती खटले लढते. सनाचे इन्स्टाग्रामवर चांगलेच फॉलोअर्स आहेत. आता 'बिग बॉस'मुळे तिच्या चाहतावर्गात आणखी वाढ होईल. सना सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करत असते. 




माजी मिस इंडियाची जागा घेतली सना सईस खानने


सना रईस खानने 'बिग बॉस 17'मध्ये माजी मिस इंडिया मनस्वी ममगाईची जागा घेतली आहे. मनस्वी ममगाईने 'बिग बॉस 17' सुरू होण्याच्या एक दिवस आधी या कार्यक्रमास सहभागी होण्यास नकार दिला. पण तरी वाईल्ड कार्ड एन्ट्री ती घेऊ शकते. मनस्वी ऐवजी सना रईस खान बिग बॉसचा खेळ खेळणार आहे.


शीना बोरा हत्याकांडात सना रईस खानने इंद्राणी मुखर्जी यांची वकील म्हणूनही महत्त्वाची भूमिका बजावली होती. इंद्राणी मुखर्जी यांना त्यांची लेक शीना बोरा हिच्या कथित हत्येप्रकरणी 15 ऑगस्टला मुंबई पोलिसांनी मुख्य आरोपी म्हणून अटक केली होती. याव्यतिरिक्त, सीबीआयने इंद्राणीवर खून, गुन्हेगारी कट, पुरावे गायब करणे, अपहरण, फसवणूक आणि कट रचणे यासह अनेक आरोप दाखल केले आहेत.


संबंधित बातम्या


Bigg Boss 17 : पहिल्यांदाच तीन घरांत रंगणार 'बिग बॉस 17'चा खेळ! आलिशान घर, थीम अन् स्पर्धक; जाणून घ्या सर्वकाही एका क्लिकवर...