Bhumi Pednekar : बॉलिवूड अभिनेत्री भूमी पेडणेकर (Bhumi Pednekar) नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असते. अभिनेत्रीच्या आगामी चित्रपटांची चाहत्यांना उत्सुकता आहे. अशातच आता वर्ल्ड इकॉनॉमिक फोरममध्ये भारतातील यंग ग्लोबल लीडर असल्याचा अभिमान आहे आणि पुढचे वर्ष माझ्या सिनेमासाठी खास असल्याचं, भूमी पेडणेकर म्हणाली आहे.
अभिनेत्री भूमी पेडणेकरची जागतिक आर्थिक मंचाने यंग ग्लोबल लीडर्स (YGL) म्हणून निवड केली आहे. भूमीचा आता जगातील एक यंग ग्लोबल लीडर म्हणून समावेश करण्यात आला आहे. आपल्या अभिनय आणि सौंदर्याने भूमी पेडणेकरने संपूर्ण जगाला भूरळ घातली आहे.
वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमने जाहीर केली यादी
एप्रिल महिन्याच्या सुरुवातीला वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमने 40 वर्षांखालील सुमारे 90 चेंजमेकर्सची यादी प्रसिद्ध केली आहे. जे भविष्य सुखकर करण्यासाठी प्रयत्न करत आहेत. सार्वजनिक आरोग्य, आर्थिक विकास, तंत्रज्ञान आणि टिकाऊपणा या क्षेत्रांमध्ये त्यांच्या महत्त्वपूर्ण कार्याद्वारे सकारात्मक बदलांना गती देत आहेत. वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमने जाहीर केलेल्या यादीत राजकारण, व्यवसाय, नागरी समाज, कला आणि शैक्षणिक क्षेत्रातील उगवत्या ताऱ्यांचा समावेश आहे. भूमीशिवाय या यादीत Nykaa Fashion चे CEO अद्वैत नायर यांचाही समावेश आहे; सोबतच अर्जुन भरतिया, ज्युबिलंट ग्रुपचे संचालक; प्रिया अग्रवाल हेब्बर, वेदांत लिमिटेडच्या बिगर कार्यकारी संचालक; आणि शरद विवेक सागर, संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी, डेक्सटेरिटी ग्लोबल यांचा ही समावेश आहे.
पुढचं वर्ष माझ्यासाठी खास : भूमी पेडणेकर
भूमी पेडणेकर म्हणते,“वर्ल्ड इकॉनॉमिक फोरममध्ये भारतातील एक यंग ग्लोबल लीडर असल्याचा मला अभिमान आहे. हे मला माझ्या आयुष्यातील प्रत्येक मिनिट सामाजिक हितासाठी समर्पित करण्यास प्रवृत्त करते. ही ओळख आणखी खास आहे कारण पुढच्या वर्षी सिनेसृष्टीत पदार्पण करुन मला 10 वर्षे पूर्ण होत आहेत. जगाच्या विविध भागांतील बदल घडवणाऱ्यांशी संवाद साधून मला सतत प्रेरणा मिळते जे बदल घडवून आणण्यासाठी चर्चा करत आहेत. हे आश्चर्यकारकपणे प्रतिष्ठित व्यासपीठ मला अशा तेजस्वी मनांशी जोडण्याची आणि आपल्या भावी पिढ्यांसाठी एक चांगले जग मागे सोडण्यासाठी शक्ती एकत्र करण्याची संधी देते".
वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या म्हणण्यानुसार, गेल्या दोन दशकांपासून, तरुण जागतिक नेत्यांचा मंच आघाडीवर आहे, जो जगातील सर्वात गंभीर समस्यांना तोंड देण्यासाठी समर्पित असलेल्या नेत्यांचा एक अद्वितीय समुदाय तयार करण्यात आघाडीवर आहे.
संबंधित बातम्या