Subodh Bhave : मराठी सिनेसृष्टीत अभिनेता सुबोध भावे (Subodh Bhave) याने आपले वेगळे स्थान निर्माण केले आहे. सुबोधने रंगभूमी ते टीव्ही मालिका, रुपेरी पडद्यावर विविध धाटणीच्या भूमिका साकारल्या आहेत. सुबोधचा मोठा चाहता वर्ग असून सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांच्याशी तो संवाद साधत असतो. आपल्या नव्या प्रोजेक्टपासून ते कुटुंबासोबतचे खास क्षण तो चाहत्यांसोबत शेअर करत असतो.
सुबोध भावेने पत्नी मंजिरीला खास शुभेच्छा दिल्या आहेत. सुबोधने मंजिरीला 6 मे 1991 रोजी प्रपोज केला होता. या खास दिवसाला 33 वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने सुबोधने जुन्या आठवणींना उजाळा दिला आहे. प्रेक्षकही या व्हिडीओवर खूष दिसले. त्यांना 33 वर्षांपूर्वीचा सुबोध भावे दिसला. त्याशिवाय, त्याने आपली प्रेमकथा चाहत्यांना सांगितली.
सुबोधने आपल्या व्हिडीओत काय म्हटले?
सुबोधने आपल्या व्हिडीओमध्ये म्हटले की, ३३ वर्षांपूर्वीचा सुबोध नेमका कसा होता हे या व्हिडीओतून समोर आलं पाहायला मिळत आहे. या व्हिडीओमध्ये सुबोध असं बोलताना दिसत आहे की, “नमस्कार, आज आमच्या सेटवरुन एक खास गोष्ट तुमच्याशी शेअर करायची आहे. मी तुमच्या सगळ्यांसाठी नवीन, नाजूक, हळूवार रोमॅंटीक गोष्ट लवकरच घेऊन येत आहे. आजच्या दिवशी ही गोष्ट शेअर करावीशी वाटली कारण आजचा दिवस खूप महत्त्वाचा आहे. आज 6 मे आणि बरोबर 33 वर्षांपूर्वी 1991 साली मी मंजिरीला प्रपोज केलं होतं आणि तिने मला हो म्हटलं होतं”.
“मंजिरी आठवत आहे ना आणि कुठे हो म्हटलं होत हे आठवतंय का?. पुण्याच्या बालगंधर्वच्या पुलावर. आमची ही लव्हस्टोरी सुरु झाली मग त्याच्यानंतर तिचे काही वर्ष इथे असणं. मग अचानक कॅनडाला निघून जाणे. मग ती पत्र, चोरून पाठवलेली पत्र, मित्रांच्या नावाने पाठवलेली पत्र, त्यांची वाट बघण्यात गेलेले अनेक दिवस, मग हळूहळू इमेल्स आणि मग 4-5 वर्षाच्या विराहानंतर मंजिरी परत आली. आठवतंय का?”. पण खर सांगतो तुझ्याबरोबर त्यानंतर आयुष्यातल्या सगळ्या सुख दुखांच्या गोष्टी शेअर केल्या. तुझ्याबरोबरची प्रत्येक आठवण ही मात्र गोडच आहे आणि मंजिरी तू मला विश्वास दिलास की जगायला श्वासाची नाही प्रेमाची गरज असते” अशा शब्दात सुबोध भावेने आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.