Bhumi Pednekar :  सिनेसृष्टीत विविध विषयांना अधोरेखित करणारे चित्रपट प्रदर्शित झाले आहेत. अनेक चित्रपटांचे कौतुकही झाले आहे. स्त्रीप्रधान चित्रपटानेदेखील आपली छाप सोडली आहे. मात्र, अभिनेत्री भूमी पेडणेकरला (Bhumi Pednekar) स्त्रीप्रधान चित्रपटाचा तिटकारा असल्याचे तिने सांगितले आहे. अशा प्रकारच्या चित्रपटात काम करायचे नाही आणि पाहणार देखील नाही असे तिने म्हटले आहे. मात्र, या मागे भूमी पेडणेकरने दिलेला कारण विचार करण्यास भाग पाडणारे आहे. 


भूमी पेडणेकरने काय म्हटले?


भूमी पेडणेकरने सांगितले की, स्त्रीप्रधान या शब्दाचा तिटकारा आहे. याचे कारण म्हणजे इंडस्ट्रीमध्ये कोणीही ‘पुरुष-केंद्रित चित्रपट’ हा शब्द वापरत नाही. आपल्या देशातील प्रेक्षकांना लिंगावर आधारित चित्रपट पाहणे आवडत नाही, त्यामुळे या शब्दाचा तिटकारा असल्याचे  भूमी पेडणेकरने म्हटले. 






भूमी पेडणेकरने म्हटले की, लोकांच्या मनात एक धारणा तयार झाली आहे की प्रेक्षक लगेचच महिला चित्रपटांकडे आकर्षित होत नाहीत. जे पूर्णपणे चुकीचे आहे. अशा चित्रपटांना ‘स्त्रीप्रधान चित्रपट’ असे नाव दिले जाते. हा एक असा शब्द आहे जो मनात चिडचिड निर्माण करतो आणि मी माझ्या अंतःकरणापासून त्याचा तिरस्कार करतो. लिंग लोकांच्या निवडी परिभाषित करू शकत नाही. प्रेक्षकांना चांगला सिनेमा आणि आशय बघायचा पाहायचा असतो असेही तिने म्हटले. 






भूमी पेडणेकरने म्हटले की, जर हे गृहीतक खरे असते तर तिला इंडस्ट्रीत स्थान निर्माण करण्यात कधीच यश आले नसते. मी सशक्त महिलांच्या भूमिका करून करिअर घडवले. मी नशीबवान आहे कारण मी अशा वेळी काम करायला सुरुवात केली जेव्हा सिनेमासाठी स्त्री पात्रे लिहिली जात होती. मी नशीबवान होते की दिग्दर्शकांना माझा अभिनय आवडला आणि त्यांनी मला सुंदर चित्रपटांसाठी निवडले ज्यात महिलांना एका बदलाचे स्वरुप म्हणून दाखवण्यात आले. 


इतर संबंधित बातमी :