Bhumi Pednekar: अभिनेत्री भूमी पेडणेकर (Bhumi Pednekar) हिने बॉलिवूडमध्ये विशेष ओळख निर्माण केली आहे. भूमी ही तिच्या विविध लूकमधील फोटो सोशल मीडियावर शेअर करते. नुकतेच भूमीनं तिच्या खास लूकमधील काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहे. या फोटोला कमेंट करुन काही नेटकऱ्यांनी तिला ट्रोल केलं.
नेटकऱ्यांनी भूमीला केलं ट्रोल
भूमीनं शेअर केलेल्या फोटोमध्ये तिचे ओठ थोडे वेगळे वाटत आहेत, असं काही नेटकऱ्यांचे मत आहे. ब्लॅक आऊटफिटमधील फोटो भूमीनं सोशल मीडियावर शेअर केले. या फोटोला कमेंट करुन एका नेटकऱ्यानं भूमीला ट्रोल केलं. त्या नेटकऱ्यानं कमेंट केली, तुला लिप फिलर्सची गरज नव्हती, तू अशीच सुंदर दिसते.' तर दुसऱ्या युझरनं कमेंट केली, 'तू ओठांची सर्जरी केली आहेस का?'
भूमीनं ही गेल्या काही दिवसांपासून तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहे. भूमी यश कटारियाला डेट करत आहे, असं म्हटलं जात आहे. पण भूमीनं याबाबत अजून कोणतीही माहिती चाहत्यांना दिली नाही.
भूमीचे चित्रपट
2014 मध्ये प्रदर्शित झालेल्या दम लगा के हैशा या चित्रपटामधून भूमीनं बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. टॉयलेट: एक प्रेम कथा,बधाई दो, पती पत्नी और वो आणि गोविंदा नाम मेरा या चित्रपटांमध्ये भूमीनं काम केलं आहे. भूमी तिच्या अभिनयानं प्रेक्षकांची मनं जिंकत असते. भूमीच्या आगामी चित्रपटांची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत. काही महिन्यांपूर्वी भूमीचा भीड हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस आला. या चित्रपटात भूमीसोबत अभिनेता राजकुमार रावनं देखील प्रमुख भूमिका साकारली. भीड या चित्रपटामधील कलाकारांच्या अभिनयाचं अनेकांनी कौतुक केलं.
भूमी ही सोशल मीडियावर अॅक्टिव असते. ती विविध लूकमधील फोटो सोशल मीडियावर शेअर करते. इन्स्टाग्रामवर भूमीला 7.3 मिलियन फॉलोवर्स आहेत.
वाचा इतर महत्वाच्या बातम्या:
भूमी पेडणेकरचा हटके लूक; फोटोनं वेधलं अनेकांचे लक्ष